परळी वैजनाथ (प्रतिनिधी) नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथे प्राचार्य प्रा.अतुल दुबे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
26 जानेवारी 2025 रविवार रोजी भारत देशाच्या 76 वा प्रजासत्ताक (गणराज्य) दिन देशभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून याच अनुषंगाने परळी वैजनाथ येथील नाथ शिक्षण संस्था संचलित यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय येथे सकाळी 8:10 वाजता राष्ट्रपती महात्मा गांधी व राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.अतुल दुबे यांच्या हस्ते करून प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रा.पी. पी.तिडके मॅडम, प्रा.डी.व्ही.उंबरे मॅडम,प्रा.ए.ए.मुंडे मॅडम, प्रा.यु.एन.फड, प्रा.एस.आर.कापसे, प्रा.ए.एन.खाकरे, प्रा.के.एच.जायभाये, प्रा.ए.डी.शेख, एस.बी.आष्टेकर,व्ही. एन.शिंदे,जी.व्ही. कांबळे, ए.बी.जगतकर, यु.बी. जगताप,एन.व्ही.दळवी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment