केज (प्रतिनिधी) मसाजोग चर्चा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर 302 नुसार गुन्हा दाखल करून मोक्का लावावा अशी मागणी करत धनंजय देशमुख यांच्यासह ग्रामस्थांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले.
दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी पोलीस तपासावर नाराजी व्यक्त करत आपण मोबाइल टॉवरवर चढून जीव देणार असल्याचा इशारा काल दिला होता. त्यामुळे आज मस्साजोगमधील दोन्ही मोबाइल टॉवरभोवती पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त होता. त्यामुळे धनंजय देशमुख यांनी पोलिसांना चकवा देत गावातील पाण्याची टाकी गाठली आणि त्यावर चढून सध्या देशमुख यांचे आंदोलन सुरू आहे. मागण्या मान्य न झाल्यास टाकीवरून उडी घेण्याचा इशारा धनंजय देशमुख यांनी दिला आहे.
वाल्मीक कराडवर मकोका लावून, सरपंच हत्या प्रकरणात त्याला सहआरोपी करा, मोकाट कृष्णा आंधळेला अटक करावी, शासकीय वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम किंवा सतीश मानशिंदे यांची नियुक्ती करावी, एसआयटीत पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांची नियुक्त्ती करा, तपासाची माहिती देशमुख कुटुंबीयांना द्या, पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन याला बडतर्फ करून सहआरोपी करा, या मागण्याचे निवेदन गावाकऱ्यांनी तयार केले आहे.
No comments:
Post a Comment