Monday, May 16, 2022

देशांतर्गत होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेसाठी परळीचा भुषण नावंदे इंग्लडला रवाना.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) इंग्लड येथे देशांतर्गत अंतर क्लब क्रिकेट स्पर्धेसाठी परळी वैजनाथ तालुक्यातील मौजे परचुंडी येथील  किक्रेटपटू भुषण भिमाशंकर नावंदे यांची निवड झाली आहे. या स्पर्धेत भूषण हा टेडीगटॉन क्रिकेट क्लबकडून खेळणार असून तसा करार करण्यात आला आहे. औरंगाबाद येथून सोमवारी इंग्लड येथे रवाना होण्यापुर्वी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सोमवारी (ता.१६) भुषणचा या निवडीबद्दल सत्कार केला. 
२०१९ मध्येही इंग्लड येथे झालेल्या अंतर क्लब किक्रेट स्पर्धेतही भुषण नावंदे यांनी चमकदार कामगिरी केली होती. त्याच्याच जोरावर त्याला पुन्हा संधी मिळाली आहे. त्यावेळी भुषण ने दोन शतक झळकवले होते. टेडिंग्टन क्रिकेट क्लब डोरा जॉर्डन रोड, टेडिंग्टन, मिडलसेक्स येथे हे सामने होणार आहे. (Bushy park off Dora Jordan Road Tedddington) भुषणची सुरुवात औरंगाबाद येथील जिल्हा किक्रेट संघटनेच्या मैदानावर झाली. व्हिजन क्रिकेट अकॅडमी येथे सराव करायचा. आता पुणे येथील पीवायसी हिंदू जिमखाना येथे सराव करत आहे. तेथे त्याला निरंजन गोडबोले व मंदार चिपळुणकर हे प्रशिक्षकाचे मार्गदर्शन मिळत आहे. यासह देशाची माजी फलंदाज कोच संजय बांगर व भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव व किर्तीराज वाडेकर व फिटनेस प्रशिक्षक अनुज शेळके यांचे मार्गदर्शन लाभत आहे. केंद्रिय अर्थराज्यमंत्री डॉ.कराड यांनी केलेल्या सत्कार कार्यक्रमास भुषणचे वडील भिमाशंकर नावंदे, माजी नगरसेवक महेश माळवतकर, भाजपचे युवा नेते हर्षवर्धन कराड उपस्थित होते. 
*फोटो- सत्कार*
औरंगाबाद- इंग्लड येथे होणाऱ्या देशांतर्गत किक्रेट स्पर्धेसाठी औरंगाबादच्या भुषण नावंदे यांचा सत्कार करताना केंद्रिय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, भिमाशंकर नावंदे व मान्यवर 

No comments:

Post a Comment