बीड (प्रतिनिधी):- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांची शुक्रवार दि.13 मे रोजी बीड विधानसभा मतदार संघाचे आ.संदीप क्षीरसागर यांनी खा. शरद पवार साहेब यांचे निवासस्थान सिल्वर ओक या ठिकाणी भेट घेवून बीड मतदार संघात चालू व प्रस्तावित असलेल्या विकास कामांची माहिती दिली. याबाबत पवार साहेबांचे आ.संदीप क्षीरसागर यांनी मार्गदर्शन घेतले. संपुर्ण मतदार संघात विकासात्मक धोरण राबविण्याबाबत, खा.शरद पवार यांनीही आ.क्षीरसागर यांना सखोल मार्गदर्शन केले.बीड विधानसभा मतदार संघाचे आ.संदीप क्षीरसागर हे मतदार संघाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशिल असतात. गेल्या दोन दिवसापासून आ.संदीप क्षीरसागर पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसह सरकारमधील मंत्र्यांसोबत भेटी घेत मतदार संघातील विविध प्रश्नांबाबत पाठपुरावा करत आहेत. गुरूवारीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आ.क्षीरसागरांनी भेट घेतली आहे. यासोबतच शुक्रवार दि.13 मे रोजी थेट सिल्वर ओकवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा.शरद पवार यांची भेट घेवून मतदार संघातील विविध विकास कामांबाबत चर्चा केली तसेच प्रस्तावित असलेल्या विविध कामांची माहिती दिली. यावेळी खा.पवार यांनी विकास कामांच्या पुर्ततेबाबत आ.क्षीरसागर यांना सखोल मार्गदर्शन केले. या चर्चेमधून खा.शरद पवार यांचे मराठवाड्यात बीड जिल्ह्यातील प्रत्येक घटनाक्रमावर किती बारीक लक्ष असते व आ.संदीप क्षीरसागर हे मतदार संघाच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशिल आहेत हे दिसून आले. या भेटी दरम्यान आ.संदीप क्षीरसागर यांच्या समवेत मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक डक व डॉ.जोगदंड उपस्थित होते.