Friday, May 13, 2022

डि.सी.एफ. विजय माने यांच्यावर विनयभंग आणि लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल.


अकोला (प्रतिनिधी) दिनांक ६ मे २०२२ ला कोल्हापूर वनव्रुत्तातील सांगली प्रादेशिक वनविभागाच्या उप वनसंरक्षक कार्यालयात DCF विजय माने यांनी त्यांच्या आधिकार क्षेत्र कडेगाव-पलूस येथील कार्यरत महिला वनाधिकारी (RFO) यांचा गैरवर्तणूक करुन विनयभंग व जबरदस्तीने लैंगिक शोषण करण्यासाठी भा.द.वि. कलम 354 व 354 A अन्वये FIR क्र. 0128/ 6.5.2022 गुन्हे नोंदविण्यात आले.

महाराष्ट्र वन विभागाच्या महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांना जंगलातील वन्य श्वापदापेक्षा वासनांध नराधम अधिकाऱ्यां पासून स्वताचा बचाव करणे जिकीरीचे ठरत आहे. गत वर्षी मेळघाट अभयारण्यात दिवंगत महिला रेंजर दिपाली चव्हाण यांना उप वनसंरक्षक शिवकुमार यांचे गैरकृत्य व अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक रेड्डी यांच्या अक्षम्य दुर्लक्ष केल्याने आत्महत्या करावी लागली होती.
विजय माने 2017 ला महाराष्ट्र वन सेवेचे विभागिय वनाधिकारी DFO म्हणून अकोला वनीकरण येथे रुजू झाले.राजकीय पाठबळ, वरिष्ठांचे लांगुलचालन, मिडियाला पैशाच्या लालचेने मित्र बनवून प्रसिद्धी चित्र पसरविण्याचा हातखंडा याच्या भरोशावर एकाच वेळी अनेक कमाई वाल्या पदांचा पदभार घेऊन अल्पावधीतच जे राज्यातील इतरांना जमले नाही अशी 250 ते 300 करोडची काळी माया जमा केली. या काळ्या कमाई, पुण्याचे देवकर ज्वेलर्स, आंतरराष्ट्रीय हिरे जवाहराचा व्यापार, चिखलदरा रिसॉर्ट याचा तपास होणे गरजेचे आहे. आलेल्या हरामाच्या कमाई सोबत अनेक उन्मादक गोष्टी आल्याने व वरिष्ठांना खुश ठेवण्यासाठी Wealth, Wine, Women यांचा सर्रासपणे वापर केल्या गेला. अकोला सामाजिक वनीकरण कार्यालय, लागूनच असलेले निवासस्थान, रोपवाटिका येथे झालेल्या रासलीला त्यामधील ईच्छा/अनिच्छेने सामील अधिकारी, कर्मचारी यांची त्यावेळी दबेल व आज जाहिरपणे होणाऱ्या चर्चा बऱ्याच गोष्टी उघड करत असून सर्वांकडे संशयित नजरेने पाहिल्या जात आहे. त्यावेळी अकोला येथे अशी हिम्मत दाखवून माने यांच्या गैरकृत्यास विरोध झाला असता तर सांगली येथील घटना झालीच नसती. महाराष्ट्र शासनाने व महिला आयोगाने विजय माने विरुद्ध दाखल गुन्हात जातीने लक्ष घालून कडक कारवाई करावी.

No comments:

Post a Comment