परळी वैजनाथ (प्रतिनीधी) कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी व नागरीकांना जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी प्रभाग क्र १३ मध्ये पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतुन व गटनेते मा.वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्र १३ मधील नागरिकांची घरोघरी जावून लसीकरणाची नोंदणी ऍड.मनजित सुगरे यांनी केली होती.सदर नोंदणीची संख्या व गरज पाहून आरोग्य अधिकारी श्री.डॉ.लक्ष्मण मोरे यांनी प्रभाग क्र १३ मध्ये पावरलूम येथील पवनपुत्र हनुमान मंदीर बाजीप्रभु नगर मधील अभिनव विद्यालय येथे दिनांक ३ जुलै २०२१ रोजी सकाळी १० वाजल्यापासुन कोविडशिल्ड लसीचे लसीकरण करण्यात येत असुन प्रभागातील नागरीकांनी याचा जास्तीत जास्त संख्येने लस घेऊन सहभाग नोंदवावा असे आवाहन ऍड.मनजित सुगरे यांनी केले
No comments:
Post a Comment