परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी शहरातून प्रकाशित होणारे बीड चौफेर या वृत्तपत्राचे राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या जगमित्र निवासस्थानी आज बुधवार दि.15 जुलै रोजी परळी शहरातून प्रकाशित होणार्या बीड चौफेर या वृत्तपत्राच्या प्रथम अंकाचे व ना.धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त विशेषांकाचे प्रकाशन आज श्री.मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी बीड चौफेरचे संपादक बालाजी ढगे व कार्यकारी संपादक शेख मुकर्रम यांनी ना.धनंजय मुंडे यांच्या स्वागत केले. यावेळी दै. न्याय टाइम्स चे संपादक श्री बालकिशन सोनी व दैनिक सोमेश्वर साथीचे संपादक बाळासाहेब फड उपस्थित होते

No comments:
Post a Comment