Tuesday, July 27, 2021

परळीच्या आठवडी बाजारातील घटना महिलेची फसवणूक. सोन्याचे दागिने केले लंपास; आरोपी फरार





 परळी वैजनाथ- (प्रतिनिधी) सोमवार आठवडी बाजारातून काल दिनांक 26 रोजी बाजार करून आपल्या घराकडे निघालेल्या एका महिलेला रस्त्यात पडलेले दोन सोन्याचे बिस्किट दिसले. त्यापैकी एक तिने उचलून घेतले. त्यानंतर पाठीमागून आलेल्या एका इसमाने ते बिस्कीट मागितले. बिस्किटाच्या बदल्यात तुमचे दागिने द्या असे म्हणल्यावर या महिलेने आपल्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून दिले असल्याचा  प्रकार घडला आहे. आपल्याला भुरळ पाडून हे दागिने लंपास केल्याचे या महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.
        याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी सुनिता नवनाथ गित्ते वय 50 वर्षे राहणार वडसावित्री नगर ही महिला बाजारातून घराकडे जात असताना रस्त्यात दोन सोन्याची बिस्किटे तिला दिसून आली. यापैकी एक बिस्किट तीने उचलून घेतले. तिच्या पाठीमागून एक इसम आला व त्याने दुसरे बिस्किट उचलून घेतले. आयसी आयसीआय बँकेच्या रस्त्यावर असताना या इसमाने महिलेचा पाठलाग करत तिला गाठले व माझे सोन्याचे बिस्किट परत द्या अशी मागणी करू लागला. या महिलेला बोलत असताना सिगरेट ओढत त्याचा धूर या महिलेच्या तोंडावर त्याने सोडला त्यामुळे आपल्याला भुरळ पडली व अंगावरील 17 ग्रॅम सोन्याचे दागिने काढून दिल्याचे फिर्यादीत महिलेने म्हटले आहे. दरम्यान याप्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास चव्हाण हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment