पुणे (प्रतिनिधी) हलिमा शेख एक राजकीय, सामाजिक कार्याचे अष्टपैलू महत्व असलेली व्यक्तिमत्व त्यांच्याच शब्दात जाणून घेऊ.
मी हलीम अल्ल्हाबकश शेख महाराष्ट्रात २००४ ला पुणे येथे आले. आल्यावर काही दिवस नातेवाइकांना कडे राहिले,काही महिने शिवाजीनगर रेल्वे स्टेशन येथे राहिले. कालांतराने मी माझ्या मुला बाळां सोबत पाटील इस्टेट मध्ये राहण्यास सुरुवात केली. लोकांची घरकामे करून मुलांचे पालन पोषण व शिक्षण करू लागली. पुढे जाऊन मी समाजसेवा करण्याचे धोरण मनात ठेवले.त्यावेळेस मी काही महिलांना सोबत घेऊन महिला बचत गटाची सुरुवात केली. माझी अनेक राजकीय व सामाजिक कार्यकर्ते सगळे एकत्रित येऊन आम्ही सामाजिक कार्यां ची सुरुवात केली. त्यावेळी मी अनेक राजकीय व सामाजिक संघटनांमध्ये पदाधिकारी म्हणून सामाजिक कार्य केले. मी माझ्या स्वतःच्या मेहनतीने व स्वतःला खंबीरपणे मन घट्ट ठेऊन माझ्या संस्थेची स्थापना केली .२०१६/१७ मध्ये स्वयं प्रेरणा विकास संस्था म्हणून स्थापन. परिस्थिती हलाक्याची असल्यामुळे आर्थिक टंचाई येऊ लागली त्यामध्ये मला काँग्रेसचे मा.आमदार विनायक निमन यांनी खूप सहकार्य केले.
मी २००४ ते २०२५ पर्यंत मी अनेक सामाजिक- राजकीय पक्षासोबत पदाधिकारी म्हणून कार्य केले. शेवटी समाजाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर त्यांच्या हक्कासाठी पत्रकारिता हेच एक पर्याय असल्याचे दिसून आले. म्हणून मी पत्रकारितेत लोकशाही पत्रकार संघांचे प्रदेश कार्याध्यक्ष अयुब पठाण खान यांच्या माध्यमातून सं.अ.बीबी वैद्य सर यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या साप्ताहिक /दैनिक युवती राज वृत्तपत्राची उपसंपादक म्हणून मला संधी दिली. तसेच लोकशाही पत्रकार संघाच्या महिला आघाडी प्रदेश उपाध्यक्ष म्हणून ही मोठी जबाबदारी तर दिलीच त्याच सोबत महिला अन्याय अत्याचार निर्मूलन समिती च्या प्रदेश अध्यक्ष पदी निवड करून अयुब सर आणि वैद्य सर यांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला त्याला तडा जाऊ देणार नाही. राज्यात जेथे कुठे महिलांवर अन्याय - अत्याचार होतील तिथे पाहिलं मी जाऊन त्या महिलांना न्याय मिळवून देणार. साप्ताहिक युवती राज च्या वर्तमान पत्रातून अनेक लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न मी करिन हे ही तितकेच खरं. लोकशाही पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्यात च मोठं करणार नाही तर संपूर्ण भारतात संघ मोठा करिन असं ही नमूद करते. येथून पुढचा माझा प्रवास फक्त आणि फक्त आता समाज सेवा आणि पत्रकारिता सोबत प्रत्येक तालुका आणि जिल्ह्यात सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी " पत्रकारांचा कट्टा " हे चालू करून या मध्यमातून अनेकांचे प्रश्न सोडविणार आहे. प्रत्येक प्रश्नाचे निरासन करण्यासाठी पत्र व्यवहार, फोन, प्रत्येक्षात भेटून प्रश्न सोडविणार आहे. असे ही लोकशाही मध्ये हुकूम शाही चालवीणाऱ्या विरोधात आंदोलन, मोर्चा, उपोषण करिन पण सर्वसामान्यांना न्याय मिळवून देईल. हाच माझा ध्यास राहील. कारण मला आजपर्यंत माझ्या समाजाने, गोरगरीब जनतेने जे मला दिलं. ते मला परत देणं गरजेच आहे हा उद्देश समोर ठेवून मी समाजासाठी अहोरात्र प्रयत्न करीन.
No comments:
Post a Comment