Thursday, May 29, 2025

वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या नगरीत संतांची पावले रोखणाऱ्या काम तत्काळ थांबवा - अभयकुमार (पप्पू) ठक्कर यांचा इशारा.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) हिंदू धर्मातील आणि विशेषतः वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचा आषाढी एकादशीचा महोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना, परळीतील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी उड्डाणपुलाचे दुरुस्तीचे काम प्रशासनाने २६ मे पासून सुरू केले आहे. या निर्णयामुळे पंचम ज्योतिर्लिंग प्रभू श्री वैद्यनाथाच्या नगरीत येणाऱ्या संत गजानन महाराज, गुलाब महाराज, नामदेव महाराज यांच्यासह शेकडो पालख्या अडकल्या असून, टाळ मृदंगाच्या गजरात चालणाऱ्या वारीच्या मार्गात अडथळा निर्माण झाला असल्याचे माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) नेते श्री. अभयकुमार उर्फ पप्पू अण्णा ठक्कर सांगून उड्डाणपुलाचे काम तत्काळ थांबवून, ते पालखी मार्ग मोकळा झाल्यानंतरच सुरू करावे, अशी ठाम मागणी ठक्कर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
या प्रकारामुळे संताप व्यक्त करत, परळी शहराचे माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) नेते श्री. अभयकुमार उर्फ पप्पू अण्णा ठक्कर यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले आहेत. त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की, "वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा श्वास आहे. आषाढी एकादशी ही त्यांच्या श्रद्धेचा शिखरबिंदू आहे. वारी ही केवळ परंपरा नाही, ती आपल्या अस्मितेची चालती-बोलती साक्ष आहे. अशा वेळी प्रशासनाने मार्ग मोकळा ठेवण्याऐवजी अडथळे निर्माण करणे, हे असंवेदनशील आणि दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले. उड्डाणपुलाचे काम तत्काळ थांबवून, ते पालखी मार्ग मोकळा झाल्यानंतरच सुरू करावे, अशी ठाम मागणी ठक्कर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
प्रशासनाने वेळेवर योग्य निर्णय न घेतल्यास, वारकरी भक्तांच्या भावना दुखावल्या जातील आणि याचे परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील, असा स्पष्ट इशारा देखील त्यांनी दिला आहे.

No comments:

Post a Comment