परळी वैजनाथ (प्रतिनिधी) पंचम स्वयंभू ज्योतिर्लिंग प्रभू श्री वैद्यनाथांच्या पुण्यभूमी असलेल्या परळी नगरीत गुढीपाडव्याच्या पावन दिवशी परंपरेनुसार 118 वर्षांची परंपरा असलेल्या श्री शंभू महादेवाच्या वाघाच्या काठी व कावडीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार असल्याची माहिती परळी चे मठपती दयानंद त्रिंबक स्वामी यांनी दिली आहे.
यंदाचा श्री शंभू महादेवाची काठी व कावड हा पवित्र उत्सव दयानंद स्वामी मठपती, जंगम गल्ली यांच्या निवासस्थानी साजरा होणार आहे.
विधीवत स्थापना - दिनांक 30 मार्च रोजी सकाळी 10 वाजता, वाघाच्या काठीची व कावडीची स्थापना होईल. महाआरती - सायंकाळी 5 वाजता, भक्तिमय वातावरणात भव्य महाआरती होईल. सवाद्य मिरवणूक - त्यानंतर वाघाची काठी व कावडीची भव्य मिरवणूक सनई-ताशांच्या गजरात निघेल.
यंदा 21 फूट उंच वाघाची काठी परंपरेनुसार तळहातावर खेळवत, भक्तिभावाने नगरपरिक्रमा करेल. सायंकाळी 5 वाजता ही भव्य मिरवणूक जंगम गल्ली येथून निघेल. नांदूर वेस, आंबेवेस, पेठ गल्ली, देशमुख पार मार्गे माजी आमदार कै. लक्ष्मणराव देशमुख यांच्या गढीच्या वाड्यात पोहोचेल. तेथे काठी व कावडी अकरा दिवसांसाठी विराजमान होईल, आणि या काळात भाविकांना दर्शन व पूजनाचा लाभ घेता येईल.
या धार्मीक कार्यक्रमाचा परळी शहर व पंचक्रोशीतील भाविकांनी मोठया संख्येने उपस्थित राहुन लाभ घ्यावा असे आवाहन समस्त मठपती परिवार यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment