Wednesday, March 5, 2025

आता घरबसल्या तुमच्या मोबाईलवरच करता येणार रेशनसाठी ई-केवायसी; कशी? वाचा !


शासनाने शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. स्वस्त धान्य दुकानातून ई-पॉस मशीनद्वारे मोफत केवायसी केले जात आहे, परंतु लहान मुले आणि वृद्ध लोकांना बोटांचे ठसे आणि डोळ्यांद्वारे स्कॅन करताना अडचणी येत आहेत.

या पार्श्वभूमीवर शासनाने मेरा ई-केवायसी अॅप कार्यरत केले आहे. आता लाभार्थी स्वस्त धान्य दुकानात न जाता काही मिनिटांत स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबाचे केवायसी पूर्ण करता येणार आहे.

अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी घरबसल्या काही मिनिटांतच आपली ई-केवायसी पूर्ण करू शकतात. राज्य सरकारने NIC च्या सहकार्याने लाभार्थ्यांच्या सोयीसाठी Mera E-KYC हे ॲप सुरू केले आहे. यामुळे लाभार्थ्यांना प्रत्यक्ष रास्त भाव दुकानावर न जाता घरबसल्या ई-केवायसी पूर्ण करता येईल.

मुख्य वैशिष्ट्ये१) घरबसल्या सोप्या पद्धतीने ई-केवायसी करा.२) फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञानाद्वारे झटपट पडताळणी.३) रास्त भाव दुकानदार किंवा इतर कोणताही सदस्य ई-केवायसी करू शकतो.४) आधार क्रमांक मोबाईलशी लिंक असणे आवश्यक.

ई-केवायसी कशी करावी? (Step-by-Step मार्गदर्शन)

१) प्ले स्टोअरवरून खालील दोन ॲप डाउनलोड करा.अ) Mera E-KYC Mobile App खालील लिंकवरून डाउनलोड करा.https://play.google.com/store/apps/details?id=com.nic.facialauth ब) Aadhaar Face RD Service App खालील लिंकवरून डाउनलोड करा.https://play.google.com/store/apps/details?id=in.gov.uidai.facerd

२) ॲप इन्स्टॉल करून सेटअप करा.दोन्ही ॲप इन्स्टॉल करा आणि आवश्यक परवानग्या द्या.

३) Mera E-KYC ॲप उघडा आणि पुढील स्टेप्स फॉलो करा.राज्य : महाराष्ट्र निवडा.आधार क्रमांक : टाका आणि आधारशी संलग्न मोबाईलवर आलेला OTP प्रविष्ट करा.कॅप्चर : दिलेल्या कोडची नोंद करा.

४) चेहऱ्याद्वारे पडताळणी करा (Face Authentication)स्वतःसाठी समोरचा कॅमेरा सुरू करून चेहरा स्कॅन करा.स्क्रीनवर दिलेल्या सूचनांनुसार डोळ्यांची उघडझाप करा.दुसऱ्या व्यक्तीची केवायसी करत असल्यास बॅक कॅमेरा वापरा.

५) सत्यापन पूर्ण- यशस्वी पडताळणी झाल्यास लाभार्थ्याची माहिती रास्त भाव दुकानाच्या ई-पॉस मशीनवर दिसेल.याची खात्री करण्यासाठी ॲपमध्ये "E-KYC Status" तपासा.जर "E-KYC Status - Y" दिसत असेल, तर प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

अत्यंत महत्त्वाचेही सेवा फक्त महाराष्ट्रातील लाभार्थ्यांसाठी उपलब्ध आहे.महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित लाभार्थ्यांसाठी IMPDS KYC पर्यायाचा उपयोग करावा.शेवटची तारीख : ३१ मार्च २०२५ (परंतु २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण करावी).

रास्त भाव दुकानदारांनी देखील शिधापत्रिकाधारकांना सहकार्य करून सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी लवकरात लवकर पूर्ण करावी, जेणेकरून कोणत्याही लाभार्थ्यांना अन्नधान्यापासून वंचित राहावे लागू नये.

No comments:

Post a Comment