अंबाजोगाई (प्रतिनिधी) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आणि महाराष्ट्र राज्य लिंगायत कोष्टी समाज संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त अंबाजोगाई येथे भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरवात श्रृती बिरंगे यांनी स्वागत गीत गाईले व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते चौंडेश्वरीदेवीच्या प्रतिमेची पुजा व दिप प्रज्वलन करून झाली,लिंगायत कोष्टी समाजाच्या महिला संघटनेची स्थापना करण्यात आली असून, नवनिर्वाचित कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
संघटनेच्या महिला अध्यक्षा सौ. सुनंदाताई आष्टगी यांच्या हस्ते कार्यकारिणी सदस्यांना नियुक्ती पत्र प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. नव्याने स्थापन झालेल्या कार्यकारिणीमध्ये पुढील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली:
अध्यक्ष: सौ. सीमा वरवटकर उपाध्यक्ष: सौ. वर्षा चिमणगुंडे सचिव: सौ. अश्विनी नंदिकोले सहसचिव: सौ. किशोरी शेंगुळे कोषाध्यक्ष: सौ. सीमा शेंगुळे संघटक: सौ. श्रद्धा मसनाळे आदींची निवड करण्यात आली.
महिला दिनानिमित्त समाजातील कष्टमय जीवन जगत संघर्षातून आपले स्वतंत्र विश्व निर्माण करणाऱ्या रणरागिणींचा विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी श्रीमती सुमनकाकू उमराणे श्रीमती लताताई रांजणकर श्रीमती शांताताई होळगे यांचा शाल, सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला:
कार्यक्रमाला सौ. शितल वांडरे (उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य लिंगायत हडगार कोष्टी समाज संस्था), सौ. सविताताई द्रुकर (अध्यक्ष, कोष्टी समाज अंबाजोगाई) आणि सौ. ज्योती सुरवसे यांची प्रमुख उपस्थिती होती. बालसंगोपन या विषयावर सौ. ज्योती सुरवसे यांनी मार्गदर्शन केले. तसेच, "सासूची जावाई असाच असावा असा अट्टाहास का?" या महत्त्वपूर्ण विषयावर सौ. सुरेखा बालाजी सवने शिरूर अनंतपाळ यांनी चर्चा करण्यात आली.
यावेळी समाजातील जेष्ठ महिलांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अश्विनी नंदिकोले यांनी केले, तर रूपाली आगलावे यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला.
No comments:
Post a Comment