बीड (प्रतिनिधी) मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पोलीस प्रशासनाचा हलगर्जीपणा उघडकीस आला.
देशमुख हत्याप्रकरणी पोलिसांनीच गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेतली आणि बीडच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांची तातडीने बदली केली. त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटी पथकातील काही पोलिसांचे आरोपी वाल्मिक कराडशी कनेक्शन असल्याचं देखील समोर आलं. काही पोलिसांनी वाल्मिकला मदत केल्याचाही आरोप झाला.आता पुन्हा एकदा बीडमध्ये दोन पोलिसांनी काही गुन्हेगारांना मदत केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. आर्थिक फायद्यासाठी आपली निष्ठा गहाण ठेवणाऱ्या दोन पोलिसांवर बीडचे नवे पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी मोठी कारवाई केली आहे.
वाळू तस्करांशी हातमिळवणी करून आर्थिक लाभ घेणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचं कांवत यांनी निलंबन केलं आहे. गुरुवारी रात्री ही कारवाई करण्यात आली.
मात्र दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी रिकामे ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात आणले. शिवाय त्यांनी गुन्हा दाखल करण्यासही उशीर केला. त्यांनी वाळू तस्करांशी हातमिळवणी करून पैशांसाठी अशी दिखाऊ कारवाई केल्याचा आरोप आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलीस अधीक्षक नवनीत कांवत यांनी दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे.
No comments:
Post a Comment