लग्नानंतर घटस्फोटाचे प्रमाण अधिक
प्रेमविवाह करणाऱ्यांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण अधिक आहे. अनेक जोडपी घरच्यांना न सांगता आळंदीत पळून जाऊन लग्न करतात. झटपट लग्न लावून देणारी यंत्रणा आळंदीमध्ये कार्यरत आहे.
व्यसनाधीनता आणि शिक्षणाचा अभावआहेत.
प्रेमविवाह फसण्याची अनेक कारणे आहेत. त्यातील व्यसनाधीनता आणि शिक्षणाचा अभाव ही देखील कारणे आहेत.
कौटुंबिक आणि सामाजिक तफावत : नोकरी व्यवसायामध्ये कमी मोबदला, दोन्ही कुटुंबांमधील सामाजिक, आर्थिक स्थिती, सवयी, परंपरा, आदींमध्ये असणारी प्रचंड तफावत, सत्य परिस्थिती यामधील विरोधाभास, आदी कारणे पुढे येत आहेत.
मुलांची जबाबदारी: दरम्यानच्या काळात जोडप्यांना मूल झाले तर त्याची जबाबदारी घेण्याविषयीची संदिग्धता निर्माण होते, अशी निरीक्षणे नोंदविली आहेत.
समुपदेशकाचा सल्ला
समुपदेशक पी. पी. केरकर म्हणतात, “प्रेमाने पोट भरत नसते. त्यासाठी व्यवहारही लक्षात घ्यावा लागतो. हे व्यावहारिक ज्ञान अनेक जोडप्यांना नसते. समुपदेशनाने याची जाणीव करून दिली जाते. तेव्हा पळून जाऊन लग्न केलेले जोडपे काही सेशन्सनंतर पुढे एकत्र प्रवास करण्यासाठी तयार होतात. तरीही या प्रेमीयुगुलांमध्ये घटस्फोट घेण्याचे प्रमाण जास्त दिसून येत आहे.”
No comments:
Post a Comment