आरटीई शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम वाढणार तरी कधी?;अत्यल्प शुल्कामुळे संस्था चालक हैराण
मुंबई (प्रतिनिधी): आरटीई कायद्यांतर्गत राज्यातील खासगी शाळांमध्ये राखीव असणार्या 25 टक्के जागांवर मुलांचे मोफत प्रवेश होतात. या बालकांची फी राज्य सरकारच्या वतीने दिली जात असली तरी ती सध्याच्या महागाईच्या तुलनेत प्रतिपूर्तीची रक्कम तुटपुंजी आहे. एवढ्या अल्प रकमेत शाळा चालवायच्या कशा असा सवाल खासगी संस्थाचालकांनी केला आहे. शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शुल्कप्रतिपूर्तीचा प्रत्येकविद्यार्थ्याच्या मागे शाळांना देण्यात येणारी रक्कम शालेय शिक्षण विभागाने निश्चित करत शासन निर्णय जारी केला आहे. राज्यातील 1 लाखाहून अधिक शाळांना ही रक्कम वाढेल अशी यंदा आशा होती. तथापि, शैक्षणिक वर्ष 2024-2025 या वर्षात प्रतिविद्यार्थी 17 हजार 670 रुपये या दराने शुल्क प्रतिपूर्ती करण्यास मान्यता देण्यात आली आहे.गेले कित्येक वर्ष हीच रक्कम आहे. गेल्या चार वर्षापूर्वी तरी कोरोना काळात 8 हजार रुपये दिले होते. विद्यार्थ्यांची शैक्षणिक ही प्रतिपूर्ती 2012- 13 पासून कोणतीही प्रतिपूर्ती शासनाने शाळांना वेळेत आणि सुरळीतपणे दिलेली नाही यामुळे थकबाकी कोट्यवधींनी वाढली आहे.
No comments:
Post a Comment