Wednesday, May 8, 2024

नवी मुंबईत ‘नीट’च्या परीक्षेत डमी विद्यार्थिनी, असा उघड झाला प्रकार.

नवी मुंबई (प्रतिनिधी) वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट युजीच्या सामायिक परीक्षेत बसलेल्या एका डमी विद्यार्थिनीला पर्यवेक्षकाने पकडले. सीबीडीच्या डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटीतील स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजी अॅन्ड बायोइन्फोरमॅटीक महाविद्यालयात परीक्षेवेळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सीबीडी पोलिसांनी विद्यार्थिनीला नोटीस बजावली आहे.

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट युजीची सामायिक परीक्षा रविवारी घेण्यात आली. सीबीडी-बेलापूर येथील डी.वाय.पाटील युनिव्हर्सिटीतील स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजी अॅन्ड बायोइन्फोरमॅटीक महाविद्यालयात या परीक्षेचे केंद्र होते. यावेळी वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या एका विद्यार्थिनीने आपल्या जागी डमीला परीक्षेसाठी पाठवले होते. पण परीक्षा केंद्रातील पर्यवेक्षकाच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर विद्यार्थिनीला सीबीडी पोलिसांच्या ताब्यात दिले गेले होते. या प्रकरणी पोलिसांनी ४१(अ) नुसार नोटीस बजावली आहे.

आधारकार्डमुळे बनावटगीरी उघड

नीट परिक्षेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी नवी दिल्ली येथील नॅशनल टेस्टिंग एजन्सीने परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु होण्यापूर्वी व परीक्षा संपल्यानंतर आधारकार्डची बायोमेट्रीक हजेरी घेतली जाते. सीबीडीतही विद्यार्थिनीची पर्यवेक्षकाकडून नियमाप्रमाणे आधारकार्डची बायोमेट्रीक नोंदणी करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी आधारकार्ड जुळले नसतानाही पर्यवेक्षकांनी तिला परीक्षेस बसू दिले होते. पण परीक्षा संपल्यानंतर पुन्हा पर्यवेक्षकांनी तिच्या आधारकार्डची बायोमेट्रीक नोंदणी केल्यावर आधाकार्ड जुळले नसल्याने उलट तपासणीतून प्रकार उघड झाला.

No comments:

Post a Comment