बीड (प्रतिनिधी) बीड लोकसभा मतदार मतदारसंघाच्या निवडणुकीकरीता मतदारसंघात सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वाजेपर्यंत सुमारे ६८% टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
या यामध्ये आष्टी ६९%, बीड६२%, गेवराई ६५%, केज ६८%., माजलगाव ६८%, परळी ७५% विधानसभा मतदार संघात मतदान झाले. मतदानासाठी सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसत होता.
बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये १५ आदर्श मतदान केंद्र होते. यामध्ये २८८-गेवराई २, २३९-माजलगाव -२, २३०- बीड -२ २३१-आष्टी -५, २३२-केज -४ व २३३ परळी -१ हे होते.
दिव्यांग, महिला, नव मतदार, तृतीयपंथी सर्वांनी उत्साहपूर्णपणे मतदान प्रक्रियेत भाग घेऊन मतदानाचा हक्क बजावला. बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये ११ दिव्यांग मतदान केंद्र होते, ५५ महिला मतदान केंद्र, ३१६ परदानशी केंद्र होती.
No comments:
Post a Comment