Tuesday, November 7, 2023

लोकप्रतिनिधींची घर जळाल्यानंतर एस.पी नंदकुमार ठाकूर यांच्या उचल बांगडी ची तयारी?


बीड (प्रतिनिधी) मराठा आरक्षण आंदोलनात लोकप्रतिनिधींची घर जाळण्यात आल्यानंतर बीडच्या दौऱ्यावर आलेले मंत्री छगन भुजबळ यांनी गृहमंत्रालय व पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. या घटनेमुळे बीडचे एस पी. नंदकुमार ठाकूर यांच्या उचल बांगडी च्या हालचाली सुरू झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.

माजलगाव व बीडमध्ये लोकप्रतिनिधींची घर जाळण्यात आल्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले. हे हल्ले पूर्वनियोजित कटाचा भाग होता.हल्लेखोरांनी कोडवर्ड चा वापर केला हे स्पष्ट झाले. एवढी मोठी घटना घडतांना पोलिसांची गुप्तचर यंत्रणा कशी सपशेल फेल ठरली. पोलिस यंत्रणा बघ्याची भूमिका का घेतली?
एकंदर गृह विभागावर नाराजी व्यक्त करत.एक ना अनेक प्रश्न राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी बीड छत्रपती संभाजीनगर दौऱ्यात उपस्थित केले.सोबतच जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत एस आय टी मार्फत चौकशी करण्याची मागणी आपण सरकारकडे करणार असल्याचं सांगितलं. सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचे काय? असा सवाल आता सर्वसामान्य जनतेतून उपस्थित केला जाऊ लागला आहे. दरम्यान बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी एक महिन्यापूर्वी नाशिक अथवा नंदुरबार या ठिकाणी बदली व्हावी यासाठी प्रयत्न केले होते मात्र त्यात त्यांना यश आले नव्हते. परंतु जाळपोळीच्या घटनेनंतर त्यांची या आठवड्यात बदली होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.

No comments:

Post a Comment