बीड (प्रतिनिधी): राज्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडत आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्याचा बळी घेतल्याची घटना. बीड जिल्ह्यात समोर आली आहे. पाली गावात जनावरे सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. आत्माराम निवृत्ती राऊत असं मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
मयत
शेतकरी आत्माराम राऊत हे आपल्या शेतामध्ये जनावरे चारत होते. या दरम्यान पावसाचे वातावरण निर्माण होऊन विजांचा कडकडाट झाला आणि वीज कोसळली. त्यामध्ये शेतामध्ये असलेल्या आत्माराम राऊत यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी
बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात मृत्यूची आकस्मिक नोंद करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment