परळी वैजनाथ (प्रतिनिधी) वारकरी सांप्रदायातील शांतीब्रह्म वै.श्रीधरनाना उत्तरेश्वर पिंप्रीकर महाराज यांचे आज रविवार दि.5 नोव्हेंबर रोजी पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. वै.श्रीधरनाना उत्तरेश्वर पिंप्रीकर यांना अ.भा.वारकरी मंडळाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
वै.ह.भ.प.उत्तरेश्वर महाराज चाकरवाडीकर यांचे कनिष्ठ बंधू वारकरी सांप्रदायातील शांतीब्रह्म वै.श्रीधरनाना उत्तरेश्वर पिंप्रीकर यांचे आज निधन झाले. यामुळे संपूर्ण वारकरी सांप्रदायावर शोककळा पसरली आहे. यानिमित्त आज रविवारी शक्तीकुंज वसाहत येथे अ.भा.वारकरी मंडळाचे राज्य उपाध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या उपस्थितीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बोलतांना श्री कोकाटे म्हणाले की, वै.श्रीधरनाना उत्तरेश्वर पिंप्रीकर महाराज यांच्या अकाली जाण्याने संपूर्ण वारकरी सांप्रदायावर शोककाळा पसरली असून अत्यंत मनमिळावू व सर्वांशी प्रेमाने व आपुलकीने बोलणारे व्यक्तीमत्व आपल्यातून आज निघून गेले असून ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देओ अशी प्रार्थना केली.
यावेळी श्रद्धांजली सभोस अ.भा.वारकरी मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
No comments:
Post a Comment