बीड (प्रतिनिधी):- तथागत सम्यक संबुद्ध यांच्या २५६६ व्या जयंतीनिमित्त बीडमध्ये दि.१४ मे ते १६ दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव मोठ्या आनंद उत्साहात साजरी करण्यात येणार असून या कार्यक्रमांमध्ये बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
दि.१४ मे रोजी सकाळी ९ ते ११ दरम्यान निबंध स्पर्धेचे आयोजन सांची बुद्ध विहार अंकुश नगर बीड येथे करण्यात आले असून 'आधुनिक जगाला बुद्ध तत्त्वज्ञानाची गरज' हा निबंधाचा विषय असून (वयोगट १५ ते ३०) यांनी सहभाग नोंदवायचा आहे.तसेच १४ मे रोजी सायंकाळी ७ वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बीड तेथे बुद्धांच्या मार्गाशिवाय ओबीसींची मुक्ती अशक्य या विषयावर व्याख्याते राजारामजी पाटील (भारतीय संविधानाचे प्रसिद्ध विचारवंत तथा ओबीसी नेते रायगड) यांचे
व्याख्यान होणार आहे. दि १५ मे रोजी सम्राट अशोक बुद्ध विहार बलभीम नगर पेठ बीड येथे धम्म ज्ञान स्पर्धा होणार आहे यात (वयोगट १५ ते ३०) यांनी सहभाग नोंदवायचा आहे. दि.१६ मे रोजी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक निघणार असून सकाळी ८:३० वाजता धम्म ध्वजारोहन होणार आहे. यावेळी पायी रॅली निघणार असून मिरवणुकीचा मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते माळीवेस, बलभीम चौक कारंजा मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे मिरवणुकीची सांगता होणार आहे. सकाळी १०:३० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन ते शिवणी मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता शिवणी येथील ऐतिहासिक बोधिवृक्षाची पूजा करण्यात येणार आहे. सकाळी ११:३० वाजता शिवणी येथे धम्म ध्वजारोहण झाल्यानंतर कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.दुपारी १ ते २ या वेळेत बक्षीस वितरण होणार असून त्यानंतर दुपारी २ ते ५ यावेळेत धम्मदेसनेत पु.डॉ.भदंत इंदवस महाथेरो मुंबई, पु. भिक्खु धम्मशील हिंगोली/बीड, पु. श्रामनेर भंते धम्मदिप बालाघाट (MP) यांचे मार्गदर्शक लाभणार आहे.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बीड तहसीलदार सुहास हजारे यांची उपस्थिती राहणार आहे. सरणतयाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.या कार्यक्रमात बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment