बीड (प्रतिनिधी) बीड शहर विकास कामाचा आराखडा चे पत्रक दाखवणाऱ्या बीड शहराचे माजी नगराध्यक्ष डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांनी गेल्या पाच वर्षात नरसोबा नगर पालवन चौक अंतर्गत रस्ते नाल्या घनकचरा यासंदर्भात कोणता विकास केला या संदर्भात विकास काम दाखवून द्यावे. प्रत्येक पाच वर्षात नरसोबा नगर पालवण चौक भागातील लोकांची दिशाभूल करण्याचे काम माजी नगराध्यक्ष करत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे बीड शहराध्यक्ष लखन जोगदंड यांनी केला आहे. नगरसेवकाच्या उदासीन धोरणामुळे या भागातील विकास खुंटला असून या भागातील वंचित बहुजन नागरिकांसाठी व त्यांच्या सामाजिक भौगोलिक आर्थिक प्रश्नांसाठी व्यापक प्रकारचे जन आंदोलन आपण करणार असल्याचे या वेळी लखन जोगदंड यांनी म्हटले आहे. नगरपरिषद च्या निवडणुका जवळ येताच विकास भूषण विकासाची कामे करण्यासाठी नारळ फोडत असले तरी सामान्य नागरिकांनी यांच्या दिशाभूल करणाऱ्या विकासकामांना बळी न पडता येणाऱ्या काळामध्ये यांना त्यांची जागा दाखवून दिल्या शिवाय राहणार नाही. निवडणुकांच्या चार महिने अगोदर यांना विकास कामे सुचतातच कसे सामान्य नागरिक आपल्या सामाजिक अडचणी सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधींना निवडून देतात परंतु स्वतःच्या स्वार्थाची पोळी भाजून घेण्यामध्ये स्थानिक नगरसेवक व नगराध्यक्ष मशगुल असल्याचाही आरोप यावेळी वंचित बहुजन आघाडी चे बीड शहराध्यक्ष लखन जोगदंड यांनी तसेच दिलेल्या पत्रकात कळवले आहे.
No comments:
Post a Comment