Tuesday, May 3, 2022

सिरीयस पेशंटला धोक्याच्या बाहेर काढण्याची क्षमता परळीच्या डॉक्टरांमध्ये- ना. धनंजय मुंडे


*वैष्णवी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळीतील डॉक्टरांकडे कितीही सिरीयस पेशंट गेला तरी त्याला त्या परिस्थितीतून बाहेर काढण्याची क्षमता परळीतील डॉक्टरांमध्ये आहे. हे मी पाहिलेल आहे अनुभवलेल आहे.आपल्या हातून रुग्ण लवकरात लवकर बरा व्हावा हेच यश प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत आपणाला मिळावे. अशी प्रार्थना मी करतो. परळीतील सर्वच डॉक्टरांचा ते करत असलेल्या रूग्ण सेवेबद्दल अभिमानच नाही तर मला गर्व सुद्धा आहे. असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी वैष्णवी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अक्सीडेंट डेंटल अँड जनरल च्या च्या शुभारंभ सोहळ्याप्रसंगी बोलताना केले.
              अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर डॉ.पांडुरंग गंगाधर फड यांच्या वैष्णवी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटलचा दि.3 में 2022 मंगळवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक,अंबाजोगाई रोड परळी येथे सामाजिक न्याय मंत्री धनंजयजी मुंडे यांच्या शुभ हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले. यावेळी श्री. ह.भ.प.हरिहर महाराज दिवेगावकर यांची विशेष उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सदस्य आ.संजय भाऊ दौंड हे होते. डॉ.भास्कर खैरे (अधिष्ठाता स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंबाजोगाई), डॉ.सुरेश साबळे (जिल्हा शल्य चिकित्सक बीड),डॉ. सूर्यकांत मुंडे (बाल रोग तज्ञ परळी),मा. गोविंद बालाजी मुंडे (सभापती न.प. परळी), डॉ. सतीश गुट्टे, डॉ. घुगे, डॉ. संतोष मुंडे, डॅा. हरिश्चंद्र वंगे ,डॅा.राजारामजी मुंडे, अजय मुंडे,अभय मुंडे, डॅा.मधुकर आघाव ,माणिकभाऊ फड, डॅा.रांदड, डॉ.मधुसुधन काळे, डॉ.टि.आर.गित्ते, डॉ.संदिप घुगे, डॉ.वाल्मीक मुंडे,डॉ.शिरीष आघाव, डॉ.अमोल चाटे, डॉ.घुगे रंजना, डॉ.दैवशाला घुगे, डॉ.शालीनीताई कराड, डॉ.केंदे मॅडम, डॉ.दिनेश कुर्मे,  बन्सीअण्णा सिरसाठ,राजेशदादा विटेकर, माधवराव मुंडे, डॅा.बालासाहेब कराड, पो.नि.सुरेश चाटे, निळकंठ चाटे, गंगाधरराव फड,ग्रामीण पोलीस ठाण्याचे मारोती मुंडे, संभाजीनगरचे ठाकुर, कल्याण मुंडे, महेश मुंडे, नरेश मुंडे, बापु नागरगोजे, कांता फड, हरिश नागरगोजे, हरि गिराम, भागवत मुंडे, नागनाथ मुरकुटे, गंगाखेडचे तालुका अरोग्य अधिकारी केशव मुंडेयांच्यासह वैद्यकीय,सामाजिक ,राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थित मान्यवरांचे डॅा.पांडुरंग फड,डॅा.शुभांगी फड,डॅा.सिद्धेश्वर फड,डॅा.जयश्री फड यांनी स्वागत केले व आभार मानले.
     पुढे बोलताना नामदार धनंजय मुंडे म्हणाले की परळी वैजनाथ हे आता हॉस्पिटलचे हब बनत चालले आहे. दिवसेंदिवस नवनवीन हॉस्पिटल परळीत सुरू होत आहेत. वैष्णवी मल्टीस्टेट स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना चांगल्या सुविधा मिळतील अशी अपेक्षा यावेळी ना. धनंजय मुंडे यांनी व्यक्त करून हॉस्पिटल च्या सर्व डॉक्टरांना शुभेच्छा दिल्या. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष विधान परिषदेचे सदस्य आमदार संजय भाऊ दौंड यांनी फड फॅमिलीने सुरू केलेल्या वैष्णवी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ला शुभेच्छा देताना म्हणाले की, परळी शहर व तालुक्यातील रुग्णांना  हॉस्पिटल च्या माध्यमातून चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस असून त्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठीच हे हॉस्पिटल सुरू करण्यात आले असून त्यांच्या हातून चांगल्या प्रकारची रुग्णसेवा घडावी अशा शुभेच्छा यांनी दिल्या.

No comments:

Post a Comment