Saturday, May 7, 2022

सिनेअभिनेते भाऊ कदम व आ.निलंगेकर यांच्या हस्ते यश श्रीकांत ढेले याचे नीट परिक्षेतील सुयशाबद्दल सत्कार.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) येथील यश श्रीकांत ढेले याने सन 2021-22 मध्ये घेण्यात आलेल्या नीट परिक्षेत यश संपादन करून परळीचे नावलौकिक केल्याबद्दल त्याचा शनिवार दि.7 मे रोजी लातूर येथे सत्कार करण्यात आला.
चि यश श्रीकांत ढेले याने मेडिकलसाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या नीट 2021-22 मध्ये घवघवीत प्राप्त केल्याबद्दल आज लातूर येथे सुप्रसिद्ध चला हवा येऊ द्या फेम सिनेअभिनेते भाऊ कदम व माजी मंत्री तथा आ. संभाजी पाटील निलेंगकर यांचा हस्ते सत्कार  त्याचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यश हा सध्या मुंबई येथील केईएम मेडिकल कॉलेजमध्ये मेडिकलचे शिक्षण घेत आहे. त्याने नीट मध्ये 700 पैकी 650 गुण घेतले होते. यावेळी चि.यश याचे वडिल श्रीकांत ढेले व आई सौ.मनिषा ढेले उपस्थित होत्या. चि.यश हा परळीच्या नगराध्यक्षा सौ.सरोजनीताई सोमनाथअप्पा हालगे यांचा नातू आहे. त्याच्या या सुयशाबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment