उस्मानाबाद (प्रतिनीधी) टेबलावरील कपडे चोरून घेऊन जात असताना झोपलेल्या शिक्षकाच्या हातावर चोरट्याचा पाय पडला अन् शिक्षक झोपेतून जागे झाले. त्यानंतर चोरटा आणि शिक्षकामध्ये झटापट होऊन चोरट्याच्या तोंडावरील रुमाल गळून पडल्याने चोरट्याला शिक्षकाने ओळखले. ही घटना लोहारा तालुक्यातील नागूर गावात घड
शिक्षक तानाजी शहाजी पाटील (रा. नागुर.ता.लोहारा जि. उस्मानाबाद) यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, दि. 05/05/2022 रोजी पत्नी व मुले जेवण करून रात्री 09.00 वाजता झोपलो. त्यानंतर दिनांक 06/05/2022रोजी रात्री 02.00 वाजेच्या सुमारास दोन जणांनी शिक्षक तानाजी शहाजी पाटील यांच्या घराची आतील कडी हात घालून उघडली.
त्याने शिक्षक तानाजी शहाजी पाटील यांना डोक्यात तीन पाईप मारले व एक हातावर मारला. त्यावेळेस दोघांमध्ये झटापट झाली. त्यामुळे घरातील सर्वजण जागे झाले व आरडाओरड करू लागले. त्यामध्ये शिक्षक तानाजी शहाजी पाटील यांना मारहाण करणा-या चोरट्याच्या तोंडास बांधलेला रुमाल निघाला.
No comments:
Post a Comment