*दगडफेक झालेल्या घरांमध्ये एका पोलीसाच्याही घराचा समावेश.
बीड (प्रतिनीधी) : बीड जिल्ह्यामधे गुन्हेगारी थांबता थांबेना… पोलीस प्रशासनाने कितीही प्रयत्न केले तरी रोज गुन्हेगारीच्या नवनवीन घटना घडत आहेत. बीड शहरातील एका कॉलनीतील घरांवर चोरट्यांनी मध्यरात्री दगडफेक केल्याची घटना घडली आहे .
विशेष म्हणजे ज्या कॉलनीवर चोरट्यांनी दगडफेक केली आहे , त्यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचेही घर आहे .यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून नागरीकांमधे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रात्री मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी अशा प्रकारे धुमाकूळ घातलेला आहे . या घटनेमुळे येथील नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे . चोरट्यांनी घरे फोडण्याची , मारहाण केल्याच्या घटना सर्रास घडतात . मात्र अशा प्रकारे मध्यरात्रीतून दगडफेक करण्याची घटना फार ऐकिवात नाही . त्यामुळे या मागील नेमकं कारण काय आहे , हे पोलीस तपासा नंतरच समजणार आहे .बीड शहरातील शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हि घटना घडली आहे . या भागात मध्यरात्री एक वाजेनंतर अचानक काही घरांवर दगडफेक सुरु झाली . सुरुवातीला काय घडतंय हे लोकांना कळलंच नाही . नागरिकांनी घराच्या खिडक्या उघडून पाहिल्या असता हा प्रकार लक्षात आला .
No comments:
Post a Comment