___
बीड-धामणगाव-अहमदनगर राज्य महामार्गावरील वाढते अपघात आणि सार्वजनिक बांधकाम विभाग, आरटीओ आणि लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष याच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली या राज्यमार्गाचे महाविकास आघाडी पुरस्कृत मृत्युमार्ग असे नामकरण करण्यात आले यावेळी आंदोलनकर्ते यांनी मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री बीड यांचे मुखवटे धारण केले होते. आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर, भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष पाटोदा हमीदखान पठाण, बलभीम उबाळे, म्होसाबावाडीचे सरपंच बाळासाहेब शेकडे, शिवदास शेकडे व ग्रामस्थ सहभागी झाले होते.
सविस्तर माहीतीस्तव:-
___
बीड-धामणगाव-नगर राज्यमार्ग क्रमांक २ हा दौलावडगाव, कारखेल, म्हसोबावाडी, धामणगाव, डोईठाण या मार्गे बीडला जात असून या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात अपघात स्थळ, वेडीवाकडी वळणे,,अवघड घाट आहेत, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कोट्यावधी रूपये खर्च करण्यात आला असून अपघातांची मालिका सुरूच असुन जानेवारी २०२२ मध्ये याच मार्गावरील अपघाताला कारणीभूत ठरणारी वळणे, दिशादर्शक फलक बसवणे, झाडे तोडणे यासाठी २ कोटी रूपये मंजूर झाले असताना अद्याप कामाला सुरुवातच नाही.संबधित प्रकरणात कामात हलगर्जीपणा आणि अक्षम्य दुर्लक्ष करणा-या संबधित आधिका-यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. तसेच बांधकाम विभागाच्या आधिका-यांना सतत लेखी तक्रार करून सुद्धा लक्ष देत नसल्याने त्यांना गांभीर्य नसल्याचे दिसुन येते.
बीड शहरातील टेकवाणी कुटुंबातील ४ जण अपघातात ठार झाल्याची घटना आष्टी तालुक्यातील म्हसोबावाडी येथे घडली असून त्याठिकाणी वळण रस्ता असून सुद्धा कठडेही नाहीत आणि दिशादर्शक फलक सुद्धा आढळुन आला नाही .
टेकवाणी कुटुंबियांना अनोखी श्रद्धांजली :-डाॅ.गणेश ढवळे
____
या म्हसोबावाडी फाट्यावर अपघात झालेल्या ठिकाणी नामकरण फलक लावण्यापुर्वी फुले वाहुन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, या रस्त्याच्याठीकाणी दिशादर्शक फलक व संरक्षण भिंत बांधण्यात येईल हीच खरी श्रद्धांजली ठरेल
No comments:
Post a Comment