माजलगाव (प्रतिनीधी) माजलगावचे नगरसेवक अशोक आळणे यांच्यावर एक युवक अंगावर दगड घेऊन धावला. हे भांडण सोडवायला गेलेल्या व्यक्तिलाही त्याने हातावर कडाडून चावा घेतला. त्यानंतर आणखी एकाला मारहाण केली. मारहाण करून पळत जात असताना तो दोन वेळा पडला. ही घटना माजलगाव शहरात रात्रीच्या सुमारास घडली.
प्रकरणी वसीम अहेमद शेख यांच्या तक्रारीवरून सदानंद शिवलिंग कलंत्री (22वर्षे, रा गजानन नगर) याच्यावर माजलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
वसीम अहेमद शेख (रा. शिवाजी नगर, माजलगाव, जि. बीड) यांनी पोलिसांना सांगितलेली हकीकत अशी की, ते दिलीप वैजनाथ नाटकर यांच्या पृथ्वीराज झेरॉक्सवर नोकरी करतात. काल दिनांक 09/5/2022 रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास वसीम अहेमद शेख हे शिवाजी चौक येथील पृथ्वीराज झेरॉक्स या दुकानावरून घरी जात होते.
दरम्यान, शिवाजी चौक माजलगाव येथे सदानंद शिवलिंग कलंत्री (22वर्षे, रा गजानन नगर) हा तेथे आला. तो माजलगावचे नगरसेवक अशोक भगवानराव आळणे यांच्या बरोबर भांडण करत असताना वसीम अहेमद शेख यांना दिसला. त्यावेळी वसीम अहेमद शेख यांच्या झेरॉक्स दुकानाचे मालक दिलीप वैजनाथ नाटकर बालाजी वैजनाथराव नाटकर, शिवमूर्ती मच्छिद्रराव कुभार तेथे उभे होते व भांडणाची सोडवासोडव करीत होते.
परंतू सदानंद कलंत्री हा कोणाचेही ऐकत नव्हता. दोन्ही हाताता दोन दगड घेवून तो नगरसेवक अशोक भगवानराव आळणे यांच्या अंगावर धावू लागला. तो कोणाचे काहीएक ऐकत नसल्याने वसीम अहेमद शेख यांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला व त्याला गोडीने बोलून घेवून जात असताना त्याने वसीम अहेमद शेख यांच्या उजव्या हाताच्या मनगटा जवळ दाताने चावा घेतला.
No comments:
Post a Comment