Thursday, May 5, 2022

जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या 891 व्या जयंती निमित्त शक्तीकुंज वसाहतीत 8 मे रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) क्रांतीसुर्य जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या 891 व्या जयंतीनिमित्त येथील शक्तीकुंज वसाहतीतील श्रीराम मंदिर येथे 8 मे रविवार रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सार्वजनिक जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव समिती परळी औष्णिक विद्युत केंद्र च्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .रविवारी सकाळी दहा ते अकरा शिवभजन होणार आहे यावेळी परळी, नागापुर महिला भजनी मंडळ ह्या शिव भजन करणार आहेत सकाळी 11 ते11.30 2वाजता  प्रसिद्ध वक्ते डॉ सुरेशचंद्र चौधरी यांचे प्रवचन होणार आहे व 11:30 ते दुपारी 12 वाजता महात्मा बसवेश्वर महाराजांच्या वचन साहित्यावर महेश वेरुळे यांचे व्याख्यान होणार आहे दुपारी 12 ते 1 दरम्यान गुरुवर्य 108   श्री नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठ यांचे आशिर्वचन व महात्मा बसवेश्वर महाराज आरती होणार आहे .दुपारी एक ते चार महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड हे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून गुरुवर्य श्री 108 नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठ, डॉक्टर सुरेशचंद्र चौधरी, महेश वेरुळे हे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमास परळी औष्णिक विद्युत केंद्राचे उपमुख्य अभियंता एच के अवचार ,उपमुख्य अभियंता शाम राठोड, अधीक्षक अभियंता डीजे इंगळे, अधीक्षक अभियंता सीआर होळंबे ,कल्याण अधिकारी दिलीप वंजारी व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन सार्वजनिक जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती उत्सव समिती थर्मल कॉलनी परळी च्या वतीने करण्यात आले आहे

No comments:

Post a Comment