परळी(प्रतिनिधी)÷
25जानेवारी,2020रोजी”राष्ट्रीय मतदार दिवस”साजरा करण्याचे प्रपत्र ,निवडणुक आयोग,भारत सरकार नवी दिल्ली यांनी जारी केल्याप्रमाणे,मिलिंद ज्यू.काॅलेज परळी येथे “राष्ट्रीय मतदार दिवस”दि.25जानेवारी2020 रोजी सकाळी 9ते 12या वेळात विविध स्पर्धाचें आयोजन करुन साजरा करण्यात आला.
सकाळी 9वाजता “मतदार जनजागृती रॅली” मिलिंद ज्यू.काॅलेजमधुन सुरु होऊन पेठ मोहला,नटराज रंग मंदिर,टाॅवर ,महिला काॅलेज मार्गे परत मिलिंद काॅलेज मध्ये विसर्जित झाली.या रॅलीला प्राचार्य के एन पवार यांनी हिरवा झेंडा दाखवुन सुरुवात करुन दिली. या रॅलीमध्ये सहभागी विद्यार्थायांनी मतदारांनी मतदान करुन आपले राष्ट्रीय कर्तव्या पार पाडण्याच्या विविध घोषणा दिल्या.विद्यार्थियांच्या हातात घोषणांचे व काॅलेजचे बॅनर्स होते.
रॅलीच्या विसर्जनानंतर सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांनी राष्ट्रीय मतदार दिवस म्हणुन लोकशाहीवर निष्ठा ठेवण्याची शपथ घेण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.
मतदार दिवसानिमित्त काॅलेजच्या मुलां-मुलींच्या रांगोळी स्पर्धा(घोषवाक्य),भाषण स्पर्धा(मी मतदान का ?करणार),निंबध स्पर्धा(मतदान करा,राष्ट्र बळकट करा)इ चें आयोजन करण्यात आले
या सर्व कार्यक्रमांना यशस्वी करण्यासाठी प्राचार्य के एन पवार,प्रा सौ एस एम जगतकर ,प्रा बी डी फड,प्रा डि टी सोनोने,प्रा बेग एम आर ए,प्रा एस व्हि जाधव,प्रा एस डी डोंगरे,प्रा.सौ कर्हाळे मॅडम,प्रा सौ कांबळे मॅडम इ.नी परिश्रम घेतले.या सर्व कार्यक्रमाचे यशस्वी संचालन नोडल आॅफिसर प्रा विलास रोडे यांनी केले
No comments:
Post a Comment