परळी - प्रतिनीधी
अमित शाह आणि नरेंद्र मोदी गुजरात निवडणुकीवेळी हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करण्याचे तंत्र वापरायचे, तेच तंत्र ही जोडगोळी देशभर वापरत आहेत. त्यामूळ सर्वांनी आपले डोके ठिकाणावर ठेवत धर्म बाजूला सारून सरकारला जीवनावश्यक समस्या, ढासळलेली अर्थव्यवस्था, वाढत चाललेली बेरोजगारी, संपत चाललेल्या सरकारी नोकऱ्या यावर प्रश्न विचारायला हवेत असे आवाहन प्रसिध्द मानसरोग तज्ञ डाॅ राजेश इंगोले याने केले. सीएए आणि एनआरसी कायद्याच्या विरोधात केंद्र सरकारच्या निषेधार्थ सुरू असलेल्या साकळी धरने आंदोलनात मंगळवारी डाॅ इंगोले बोलत होते.
शहरातील संविधान संरक्षण भुमी नेहरू चौक तळ मंगळवारी सायंकाळी 7 ते 9 या सत्रात राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते वैजनाथ सोळंके, वृत्तसंपादक दत्तात्र्य काळे, ओमप्रकाश अप्पा बुरांडे, नगर सेवक शरद भाऊ मुंडे, संजय आघाव, विठ्ठल दंडे, संयोजन समितीचे अध्यक्ष पी एस घाडगे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना डाॅ इंगोले म्हणाले अर्थव्यवस्था ढासळत असताना देशातील जनतेला भ्रमित करण्यासाठी केंद्र सरकारने एनआरसी आणि सीएए लागू केला आहे. याविरोधात सर्वांनी जात धर्म विसरून एकत्र यावे. यावेळी मुफ्ती अशफाक यांनी मुस्लिम समुदायाने या कायद्यांविरोधातील आंदोलने गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गावर राहूनच करावीत असे आवाहन केले.
No comments:
Post a Comment