Wednesday, February 1, 2023

शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत; पाच वर्षीय बालकाला कुत्र्याने घेतला चावा. न.प.ने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा.

बीड (प्रतिनिधी) बीड शहरामध्ये मोकाट कुत्र्यांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. हे कुत्रे लहान बालकांसह नागरिकांना लक्ष्य करतात. आज सकाळी झमझम कॉलनी परिसरात एका 5 वर्षीय बालकाचा कुत्र्याने चावा घेतल्याने सदरील बालक गंभीररित्या जखमी झाले. कुत्र्यांचा न.प.ने तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जाऊ लागली आहे.

सय्यद तारेख असद (वय 5 वर्ष) या बालकावर आज  सकाळी झमझम कॉलनी परिसरामध्ये मोकाट कुत्र्याने हल्ला केला. यात सदरील हा बालक गंभीररित्या जखमी झाल्याने त्यास उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. शहरातील विविध भागात मोकाट कुत्र्यांची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. हे कुत्रे लहान बालकांसह व्यक्तींवर हल्ला चढवतात. न.प.ने या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

No comments:

Post a Comment