जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर कृष्णा लबडे यांचे वडील काल सायंकाळी वडवणीहून बीड बसस्थानकामध्ये आले होते. मोटारसायकल घेण्यासाठी त्यांनी एक लाख रुपये आणले होते. बसमधून खाली उतरत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खिशातील एक लाख रुपये काढून घेतले. सदरील हा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. दुसरी चोरीची घटना बसस्थानक परिसरातच घडली. डॉक्टराच्या गाडीला अज्ञात चोरट्यांनी धक्का दिला. गाडी खाली पडल्यानंतर चोरट्याने तितक्या वेळात डॉक्टराच्या गळ्यातील सहा तोळ्यांची चैन हिसकावून पळ काढला. या दोन्ही घटना बसस्थानकात घडल्या असून कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.
No comments:
Post a Comment