परळी वैजनाथ (प्रतिनिधी) - रेल्वे स्टेशन नजीक असणाऱ्या रेल्वे उड्डाण पुला जवळ एक युवक गाडीतून खाली उतरत असताना तो अनावधान्याने गाडीखाली गेला आणि त्याचे दोन्ही पाय या अपघातात कटले.
निजामबाद एक्सप्रेसगाडी नंबर 11414 पंढरपूर हुन परळीच्या दिशेने येणाऱ्या गाडीतून स्थानका नजीक असलेल्या पुला जवळ वेग कमी झाल्यास खाली उतरण्याच्या प्रयत्नात सदर युवक गाडीखाली आला आणि गुडघ्यापासून खाली त्याचे दोन्ही पाय निकामी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर अपघातग्रस्त तरुणाचे नाव शेख समीर शेख हसन रा. गंगाखेड, असे आहे .सदर तरुणास उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करून अधिक उपचारासाठी स्वामी रामानंद रुग्णालय तथा वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल करण्यात आले आहे.सदर घटनेचा अधीक तपास परळी रेल्वे पोलीस करत असल्याची माहिती सपोनी सोमनाथ वाघमोडे यांनी दिली.
.....................
◾सदर युवक या गाडीतून प्रवास करत होता की त्याने स्टेशन नजीक आत्महत्येचा प्रयत्न केला याबाबत संभ्रम आहे. घटनास्थळी वेगवेगळ्या चर्चा चालू होत्या.
No comments:
Post a Comment