Monday, April 18, 2022

भारत पाकिस्तान युद्धात घायाळ झालेल्या रुई बुद्रुक येथील भास्कर गंगाधरराव गोरटकर या सैनिकांचा गावकऱ्यांच्या वतिने भव्य सत्कार.


नायगाय (प्रतिनीधी) नायगाव तालुक्यातील मौजे रुई बुद्रुक येथील रहिवासी असलेले व भारत पाकिस्तान युद्धात गोळ्या लागून घायाळ झालेले बीएसएफचे सैनिक भास्कर गंगाधरराव गोरटकर यांचा रुई खुर्द येथील रहिवासी असलेले व पोलीस खात्यात कार्यरत असलेले आनंदराव गणपतराव रुईकर पोलीस निरीक्षक पुणे यांच्या विचार श्रेणीतून बळीराम दिगंबरराव पाटील कानोले यांच्या पुढाकारातून स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष साईनाथ पाटील ढगे यांच्या निवास्थानी बीएसएफचे सैनिक भास्कर गोरटकर यांचा शाल व श्रीफळ देऊन दिनांक १६ एप्रिल २०२२ रोजी रुई खुर्द येथे सत्कार करण्यात आला असून यावेळी गावातील नव तरुण मंडळी मोठया संख्येने  उपस्थित होते

रुई बु येथील बीएसएफचे सैनिक भास्कर गंगाधर गोरटकर यांना शासनाच ताम्रपट ही गेल्या एक ते दीड वर्षाखाली मिळाल्यामुळे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर व विशेष मान्यवराच्या उपस्थित भास्कर गंगाधरराव गोरटकर यांना सन्मान चिन्ह व ताम्रपट देऊन गौरविण्यात आले होते बीएसएफचे सैनिक भास्कर गोरटकर हे अनेक पुरस्कार प्राप्त असून गेल्या काही वर्षाखाली भारत-पाकिस्तान युद्धात गोळ्या लागून घायाळ झालेले बीएसएफचे सैनिक आज ही सदरच्या सेवेत पुणे येथे कार्यरत असून यांचा सत्कार रुई खुर्द येथे उत्तम पाटील कानोले यांच्या निवासस्थानी सुद्धा करण्यात आला असून या ठिकाणी ही गावातील जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

तालुक्यातील रुई खुर्द येथील श्याम चंपतराव पाटील बेलकर, बळीराम दिगंबरराव पाटील कानोले बजरंग गोविंदराव पाटील कानोले साईराज कोंडीबा पाटील ढगे व्यंकटराव बापूराव पाटील बेलकर, शिवाजीराव माधवराव पाटील बेलकर यादवराव गणपतराव रुईकरशिवाजी मारोती सावळे ज्ञानेश्वर बालाजी सावळे गोविंदराव विठ्ठलराव कानोले साईनाथ माधवराव आटकलवाड ज्ञानेश्वर शिवाजी कानोले प्रभाकर दत्‍तराम कानोले,राजेश नारायण बेलकर, दत्‍तराम शंकरराव पाटील कानोले अंकुश गणपतराव रुईकर उत्तमराव पाटील कानोले दिगंबर पाटील पैलवान, माधवराव शंकरराव पाटील कानोले,रामदास विठ्ठलराव कानोले,गणेशराव पाटील कानोले, बापूराव नारायण पाटील जिगळे, बाबू पांचाळ यांच्यासह नागरिक सत्काराच्या वेळी उपस्थित होते 

रुई बु येथील रहिवासी असलेले गंगाधर पाटील गोरटकर यांचे चिरंजीव भास्कर गंगाधर पाटील गोरटकर हे गेल्या अनेक वर्षा पासून बीएसएफ सैनिक म्हणून सध्या पुणे येथे कार्यरत असून ते काही तरी कामाच्या निमित्ताने रुई बु येथे आले होते यावेळी रुई खुर्द येथील रहिवासी असलेले व पुणे येथे ग्रह खात्यात कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक आनंदराव गणपतराव रुईकर यांनी बीएसएफ सैनिकांना पुणे येथे कार्यरत असलेल्या सैनिकाचा आपल्या गावात सत्कार झाला पाहिजे असा विचार मनी धरून गावातील कार्यकर्त्यांना सांगीतल्यामुळे बीएसएफ सैनिकांचा यावेळी सत्कार करण्यात आला आहे

No comments:

Post a Comment