•••••••••
नायगाव (प्रतिनीधी) नायगाव तालुक्यातील पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या एकूण ८९ गावे असल्यामुळे या गावांपैकी सोळा गावातील अधिग्रहण करण्यासाठी नायगाव पंचायत समितीला प्रस्ताव दाखल झाले असून सुद्धा अद्याप कोणत्या ही गावात बोअर विहिरीचे अधिग्रह करण्यात आले नसल्याचे वास्तव चित्र दिसून येत असून पंचायत समितीचे गट विकास अधिकारी माधव केंद्रे यांना पाणी टंचाईच्या संदर्भात संपर्क करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता सदरपाणी टंचाईची माहिती देण्यास टाळाटाळ केले मला फोनवर माहिती देणे होत नाही प्रत्यक्ष ऑफिसला येऊन भेटा म्हणून फोन ठेवला करून ठेवला असला तरी एवढ्या मोठ्या कडाक्याच्या उन्हाळ्यात सुद्धा टंचाई ग्रस्त गावांत पाण्याची व्यवस्था पंचायत समिती कडून करण्यात आले नसल्याचे दिसून येत असून गट विकास अधिकाऱ्यानी पाणीटंचाईच्या संदर्भात माहिती देण्यास टाळाटाळ करून सोळा गावचे प्रस्ताव असल्याचे सांगितले आहे.
तालुक्यातील अनेक गावात अधिग्रह करण्याची आवश्यकता असताना सुद्धा नायगावच्या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी केंद्रे यांनी फक्त सोळाचा प्रस्ताव आल्याचे सांगून दोन वेळेस फोन कट केला कडाक्याच्या उन्हाळ्यात पंचायत समितीने नागरिकांना मुबलक पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत नाही तर पावसाळ्यात पाण्याची व्यवस्था करणार का असा प्रश्न जनतेतून उपस्थित केला जात असून सध्या नायगावची पंचायत समिती प्रशासकीय असल्यामुळे प्रशासनाने मोठ्या प्रमाणात काळजी घ्यायला पाहिजे होती परंतु तसे काही पंचायत समितीने पाऊल उचलले नसल्याचे दिसून येत असून या संदर्भातील पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या गावातील पाणी टंचाईचे प्रस्ताव तहसीलदार गजानन शिंदे यांनी गटविकास अधिकारी केंद्रे यांना मागवून घेण्यासाठी कल्पना केली होती परंतु गटविकास अधिकाऱ्यानी तहसीलदाराच्या सुचने कडे दुर्लक्ष लक्ष केल्याचे समजते.
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी माधव केंद्रे यांनी पाणी टंचाईच्या संदर्भात बैठक घेण्यात आली का असे विचारले असता त्यानी घेण्यात आली परंतु लक्षात नसल्याचे सांगितले नायगावच्या तहसीलदार गजानन शिंदे व गटविकास अधिकारी यांनी सरपंच व
ग्रामसेवका कडून पाणी टंचाईचे प्रस्ताव लवकर मागून घेऊन पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या गावात पाण्याची व्यवस्था केली तर पाणी टंचाईचा प्रश्न सुटेल असे नागरिकांतुन बोलल्या जातं असले तरी नायगावच्या पंचायत समितीच्या अधिकाऱ्याचे दुर्लक्ष लक्ष झाल्यामुळे
नायगावच्या तहसीलदारांना फोन करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी फोन उचलला नसल्यामुळे तालुक्यातल्या पाणी टंचाई संदर्भात माहीती आदीकची मिळाली नसल्यामुळे नायगावच्या तहसीलदारानी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याला सूचना करून बऱ्याच पैकी गावात पाण्याची टंचाई भासत असल्यामुळे लोकप्रतिनिधीने ही लक्ष देण्याची गरज आहे
No comments:
Post a Comment