Friday, April 22, 2022

सुर्यश्वर मंदिर येथे मुक्ताई महिला भजनी मंडळाच्या वतीने ह.भ.प. कोकाटे महाराज, सौ.चेतना गौरशेटे, अर्पणा चौधरी यांचा सत्कार

परळी वैजनाथ (वार्ताहर) परळी येथील सुर्यश्वर मंदिर येथे मुक्ताई महिला भजनी मंडळाच्या वतीने कोकाटे महाराज सौ.चेतनाताई गौरशेटे, व एमपीएसी परिक्षेत कु.अर्पणा चौधरी ऊतीर्ण झाल्याबद्दल मुक्ताई महिला भजनी मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ व श्री विठ्ठलाची मुर्ती भेट देऊन  सत्कार करण्यात आला  या सत्कार प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ.प. अण्णासाहेब महाराज बोधले अखिल भारतीय वारकरी मंडळ महाराष्ट्र राज्य प्रधान सचिव यांचा प्रथमतःहा बोधले महाराज यांचा शाल श्रीफळ व श्री विठ्ठलाची मुर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला तर
ह. भ. प. रामेश्वर महाराज कोकाटे अखिल भारतीय वारकरी मंडळ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष संत संमेलनावर निवड झाल्याबद्दल व बीड जिल्हा वृद्ध कलावंत कमिटीवर निवड झाल्याबद्दल या प्रसंगी सत्कार करण्यात आला  नवनाथ महाराज डिक्सळकर तसेच प्रमुख अतिथी म्हणून श्री वैद्यनाथ भजनी मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती गोदावरीताई चौधरी यांचा शाल,पुष्पहार, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला 
प्रा. सौ. चेतनाताई गौरशेटे यांना 
इनरव्हीलक्लबच्या वतीने शिक्षक गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा. सौ. चेतनाताई गौरशेटे यांचा मुक्ताई भजनी मंडळाच्या वतीने शाल पुष्पहार श्रीफळ स्मृती चिन्ह देवून सत्कार करण्यात आला.अध्यक्षा - शांता ताई केंद्रे उपाध्यक्षा - रोहिणीताई हजारे 
सचिव - रंजनाताई अलबिदे
कोषाध्यक्ष - भागिरथीताई कलशेट्टी सर्व सदस्य - कमलताई पवार उर्मिलाताई पवार सुनंदाताई पवार शांताताई सुवर्णाताई मिसाळ
मायाताई खरवलीकर मीनाताई दिक्षीत शारदाताई लक्ष्मीताई दिक्षीत तारामतीताई घोडके सुनंदाताई पंचाक्षरी प्रेमलताताई दिक्षीत अपर्णाताई गोदावरीताई चौधरी उषाताई ओपळे
वैशालीताई रोडे स्नेहाताई चौधरी यांच्या उपस्थितीत सत्कार  संपन्न या प्रसंगी कोकाटे महाराज बोलतांना म्हणाले की परळी शहरात  हाजारो महिला पुरूष भजनी  वारकरी सांप्रदयातील उल्लेखनीय कार्य करतात गावोगावी व शहरातील प्रत्येक गल्लीत वारकरी सांप्रदयाचा टाळ मृदंग वाजत आहे हे मला अभिमानिने सांगावयाचे वाटले काही महिण्यातच खास महिलांनसाठी  भजनाच्या माध्यमातून राज्यस्तरीय संत संमेलनाचे व राज्यस्तरीय भजन स्पर्धाचे अयोजन करणार आसल्याचे कोकाटे महाराज यांनी सांगितले हाजारो महिला एकञीत करून सामुहिक हरिपाठ घेनार आहोत सर्व महिलांना टाळ कसा वाजवावा याचे प्रशिक्षण व हरिपाठ म्हणतांना कसा म्हणावा व हरिपाठात पाऊल्या कस्या खेळाव्या याचेही प्रशिक्षण आम्ही वारकरी मंडळाच्या माध्यमातून देनार असल्याचे बोलतांना कोकाटे महाराज यांनी सांगितले व ह.भ.प.आण्णा साहेब महाराज बोधले  यांच्या उपस्थितीत घोषणा करण्यात आली कि लवकरच  जिल्हा व तालुका व शहर कमीटी लवकरच जाहीर होणार असल्याचे ही कोकाटे महाराज यांनी कळवले आहे कार्यक्रमाचे संचलन चेतनाताई गौरशेटे यांनी केले तर  सुनीताताई पवार यांनी मानले आभार

No comments:

Post a Comment