Tuesday, April 19, 2022

चौसाळा येथे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळयास मोठया संख्येने उपस्थित रहावे--विवेक कुचेकर

 
""आमदार संदीप क्षीरसागर व डॉ. बाबु जोगदंड यांची प्रमुख उपस्थिती""

बीड (प्रतिनिधी) चौसाळा शहरात प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक जंयती निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवुन साजरी करण्यात येणार असुन
गेल्या दोन वर्षामध्ये कोरोनोसारख्या महाभयंकर आजारामुळे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करता आली नाही 
माञ यावर्षी शासनाने कोरोनोचे सर्व नियम शिथील केल्यामुळे यावर्षी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठया उत्साहात साजरी होणार असुन दिनांक २० एप्रिल रोजी राजर्षी शाहू नगर याठिकाणी राजर्षी शाहू महाराज  यांच्या प्रतिमेस अभिवादन करून राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची  भव्य दिव्य ढोलताशाच्या गजरात मिरवणूक निघणार आहे तरी चौसाळा व  बालाघाट परिसरातील सर्व बहुजन बांधवानी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सार्वजनिक  जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष  विवेक(बाबा)कुचेकर, दलित युथ पँथर चे मराठवाडा राज्य सचिव व बीड जिल्हा अध्यक्ष  पवन कुचेकर,  स्वप्नील सोनवणे, महेंद्र सोनवणे, प्रकाश ढोकणे,विनोद तायड,बबलु आदमाने,रवी सोनवणे,जितीन काळे,आमोल जावळे,प्रदीप ईगोंले,सुरज तुपारे,कपिल मस्के,वैभव सोनवणे,प्रमेश्वर निर्मळ,राज सोनवणे, दत्ता साळवी,शैलेश वाघमारे,विशाल कांबळे, बाळासाहेब गायकवाड, मच्छींद्र गायकवाड, प्रेम तुपारे, सचिन रूपवते,सागर सिरसाळे,अजय ईगोंले,राजेश सुरवसे,कृष्णा चव्हाण,शंकर सोनवणे,विकी ढोकणे,बाबु ढोकणे, भैय्या शिंदे,सतिष रूपवते,बाळु सोनवणे,अजय पवार,चंदन सोनवणे, रोहित शिंदे यांच्यासह सर्व समाज बांधवानी केले आहे.

No comments:

Post a Comment