Sunday, April 17, 2022

शेतकऱ्यास सर्पदंश झाल्यास मिळते 2 लाख रुपये पर्यंत विम संरक्षण या विशेष माहिती पासून सामान्य शेतकरी वर्ग आज पर्यंत आहे वंचित.



शेतकरीसमस्या विशेष;-

भारत देश हा शेतकरी प्रदान देश असून वर्ग मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक शेतीवर अवलंबून आहेत,
परंतु देशाची अन्नाची गरज पूर्ण करणाऱ्या या बळीराजाला सतत हजारो समस्याना समोर जावे लागत आहे,
यामधे शेतात काम करत असतांना सर्पदंश, वीजेचा शॉक लागने,पाण्यात पडल्याने,किवा इतर विषारी जीवांच्या चावा घेतल्याने देशात हजारो शेतकरी वर्ग मरण पावले आहेत व या मुळे घरातील करता पुरुष गमवल्याने सपूर्ण परिवारास आथिक समस्याना समोर जावे लागते,
म्हणून अश्या प्रसंगी अपघातात मृत्यु झाल्यास किवा अपंगत्व आल्यास गोपीनाथ मुंडे शेतकरी विमा योजना अंतर्गत शाषना तर्फे या परिवारास आर्थिक मदत दिली जाते,
मात्र या विमा सहायता बदद्दल ग्रामीण व शहरी भागातील बहुतांश शेतकरी वर्गणा काहीच माहित नसल्याने है शेतकरी याचा लाभ घेण्यापासून वंचित असल्याची माहिती समोर येत आहे,

डिसेम्बर २०१५-२०१६ मधे ही गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना चालू करण्यात आलेली असून या योजने अंतर्गत मृत पावलेल्या शेतकरी वर्गच्या परिवारास कमित कमी एक लाख ते जास्तीत जास्त दोन लाख पर्यंतचा निधि देण्याची तरतूद करण्यात आली आहे,
आता यात विमाचा हफ्ता किती असेल या विषयी महिती बघूया-योजने अंतर्गत शेतकरी वर्गास हफ्ता भरण्याची गरज नसल्याचे सांगण्यात येत आहे,कारण सरकार शेतकर्याच्या वतीने विमा कंपनी कड़े पैसे भरत असल्या कारणाने अपघात झाल्यास संरक्षण रास्ता किवा रेल्वे अपघात,पाण्यात बुड़ुन मृत्यु ,विष बाधा होऊन मृत्यु,जंतुनाशक किवा इतर विषारी औषधि वापरताना झालेला मृत्यु,सर्पदंश किवा विन्चु दंश किवा इतर विषारी जीव चावल्या ने झालेला मृत्यु,जनावरानी केलेल्या हल्ल्यात झालेला मृत्यु अश्या प्रकारे होणाऱ्या अनेक अपघातास या विम्या द्वारे संरक्षण दिले जाते,
आता पाहुया या योजनेचा लाभ कोणत्या परिस्थितित घेतला जाउ शकत नाही-
नैसर्गिक मृत्यु आल्यास,विमा कालावधि पूर्वीचे अपंगत्व असणे,आत्महत्या करने,जाणीव पूर्वक स्वतः ईजा करुण घेणे,आमली पदार्थच्या नशेत असताना झालेला अपघात,स्त्रियांच्या प्रसूतितील मृत्यु,मोटरसाइकिल शर्यातितिल मृत्यु,इत्यादि प्रकारे होणाऱ्या मृत्युचा समावेश या विम्या अंतर्गत होत नसल्याने यांना या विम्याचा लाभ दिला जात नही,
विमा लाभ धारक पात्रता काय असावी -विम्याचा लाभ है दहा ते पच्याहत्तर ( १०-७५ ) वयोगटातिल ऐकून दोन जणांना विमाछत्र देण्यासाठी सुधारित स्वरुपात मान्यता देण्यात आली आहे,विमा छत्र कुटुंबातील शेतकरीची आई-वडील, पति -पत्नी, मुलगा-व अविवाहित मुलगी यांचा समावेश ग्राहय धरण्यात आलेला आहे,
किती लाखांचे विमा संरक्षण असते-
१) अपघाती मृत्यु झाल्यास- दोन लाखांचा विमा
२)अपघतामुळे दोनी हाथ किवा डोळे किवा दोन्ही पाय कायमचे अपंगतव आल्यास दोन लाख रुपये भरपाई,
३)अपघातात एक डोळा, एक हाथ किवा एक पाय गमवल्यास एक लाख रुपये भरपाई.

No comments:

Post a Comment