Wednesday, April 20, 2022

मिशन वात्सल्य तालुका समितीचा महिला महामेळावा संपन्न.तहशीदार यांनी मार्गदर्शन करून दिल्या सुचना.

  
परळी वैजनाथ (प्रतिनिधी)
मा. तहसीलदार सुरेश शेजुळ यांच्या अध्यक्षतेखाली मिशन वात्सल्य समितीचा  महामेळावा पंचायत कार्यालय येथे संपन्न झाली. 
आज मंगलवार १९  रोजी पंचायत समिती कार्यालय येथे झालेल्या बैठकीस तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी मार्गदर्शन केले . परळी शहरातील व तालुक्यातील विधवा महिला व अनाथ बालके यांना विविध शासकीय योजनेचा लाभ मिळण्यासाठी सर्व  विभागाला तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी सुचना दिल्या. 
या बैठकीस नायब तहसीलदार बाबुराव रुपनर, गटविकास अधिकारी संजय केंद्रे,बालविकास प्रकल्प अधिकारी बी.यू. रोडे, तालुका अधिकारी महिला व बालविकास ए. एन.मन्सुरी, तालुका वैद्यकीय कार्यालय, परळी शहर पोलीस निरीक्षक ,पंचायत समिती कार्यालय  अधिक्षक, गट शिक्षणाधिकारी सोनवणे , नगर परिषद् स्वच्छता निरिक्षक अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी , बाकविकास प्रकल्प व कार्यालय बी. आर. शेरेकर, महिला व बालविकास विभाग,शेख आखिब, पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते शेख  मुकरम ,मिलिंद घाडगे,पालवडे मॅडम आदी जण उपस्थित होते.

No comments:

Post a Comment