Wednesday, April 20, 2022

रेल्वे प्रवाश्यांचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर. रेल्वे क्रॉसिंगवर चोरट्यांचा धुमाकूळ. प्रवासी महिलांचे दागिने पळवले.



परळी वैजनाथ ;(प्रतिनीधी)  परळी- परभणी मार्गावरील वडगाव येथे रेल्वे क्रॉसिंगच्या दरम्यान चोरट्यांनी धुमाकूळ घालत प्रवाशांचे दागिने पळवल्याची घटना आज (दि.१९) पहाटेघडली. या घटनेने रेल्वे प्रवासातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

शिर्डी-सिकंदराबाद एक्सप्रेस मध्ये पहाटे चोरट्यांनी धुमाकूळ घातला. परळी-परभणी मार्गावरील वडगाव (स्टे.) येथे रेल्वे क्रॉसिंगच्या दरम्यान गाडी थांबली असताना खिडकीतून हात घालत आतील पाच प्रवाशी महिलांच्या गळ्यातील दहा तोळे सोने हिसकावून चोरट्यांनी पोबारा केला. गंगाखेड रेल्वे मार्गावर असलेल्या वडगाव निळा येथील रेल्वेची क्रॉसिंग असल्याने शिर्डी -सिकंदराबाद रेल्वे काही मिनिटे थांबली होती. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी खिडकीतून आत हात घालत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबाडून घेतले, अशी माहिती औरंगाबादहून उदगीरकडे प्रवास करणाऱ्या श्रीनिवास सोनी यांनी दिली.

No comments:

Post a Comment