Tuesday, April 19, 2022

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कन्हेरवाडी येथे भव्य रास्ता रोको आंदोलन.;- प्रसेनजित रोडे.

                                      
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उद्या सकाळी ठीक अकरा वाजता कनेरवाडी येथे भव्य रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा उपाध्यक्ष प्रसेनजित रोडे यांनी माहिती दिली आहे.     याबाबत सविस्तर माहिती अशी की कन्हेरवाडी येथील दलित वस्तीमध्ये नवीन नळ जोडणी देण्यात आली या व इतर मागण्याचे निवेदन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिले असता कुठल्याही प्रकारची कारवाई न झाल्याने उद्या सकाळी ठीक अकरा वाजता रस्ता रोको करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपाध्यक्ष प्रसेंजित रोडे यांनी दिली असून या रास्ता रोको आंदोलनास वंचित बहुजन आघाडी च्या सर्व बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे

No comments:

Post a Comment