Monday, April 18, 2022

धारूर येथील एसबीआय बँकेचे व्यवस्थापक याच्यांवर कारवाई करा.तहशीलदार यांना प्रहार चे निवेदन .

.                  ‌                                                          ‌                                                  
धारूर (प्रतिनिधी) धारुर स्टेट बँक ऑफ इंडिया मधील गोरगरीब शेतकर्यांचे कर्ज प्रकरण फाईली,तसेच महामंडळ कर्ज प्रकरण फाईली अनेक दिवसापासुन कपाटाच्या कडेला पडलेल्या आहेत.तरी बँकेचे व्यवस्थापक रोडे यांना काही व्यक्तींनी विचारणा केली असता त्याच्याकडून शेतकर्यांना उडवा उडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. शेतकरी व गोरगरीब व्यक्ती यांची मुद्दामुन बँकेचे व्यवस्थापक रोडे हे कर्ज प्रकरण फाईली मंजुर करत नाहीत.गोरगरीब व्यक्तींना अरेवारीची भाषा करतात.अशा गैर वापरामुळे व्यवस्थापक रोडे यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रहारचे जिल्हा सरचिटणीस हनुमंत तोंडे, प्रहार धारुरचे शहरध्यक्ष बापू सिरसठ,लोखंडे रोशन यांच्याकडून धारुर तहसिलला निवेदन देण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment