Saturday, April 30, 2022

धक्कादायक. ...घरगुती करणामुळे लाकडी दांडक्याने फटके मारून सुनेने घेतला सासूचा जीव.

 

महाराष्ट्रात एक खळबळजनक घटना औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे उघडकीला आली असून घरगुती कारणावरून सुनेने मारहाण केल्यानंतर चक्क सासूचा मृत्यू झालेला आहे विशेष म्हणजे सासूचा मृत्यू झाल्यानंतर सुनेने चक्कर येऊन पडल्याचा बहाना करत सासूला दवाखान्यात दाखल केले होते मात्र तिचे बिंग फुटले आणि ही खळबळजनक घटना समोर आली. कौशल्याबाई अंबादास हरवणे ( वय 45 ) असे सासूचे नाव असून कांचन गणेश हरवणे असे ( वय 22 ) असे सुनेचे नाव आहे.

उपलब्ध माहितीनुसार, कौशल्याबाई हरवणे या मूळच्या नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील वडुले येथील असून पतीचे निधन झाल्यानंतर त्यांनी गाव सोडून पाटेगाव येथे राहायला गेल्या होत्या तिथे गेल्यानंतर त्यांनी स्वकष्टाने चार एकर जमीन खरेदी केली आणि आपल्या मुलाचा विवाह कांचन हिच्यासोबत लावून दिला होता.

काही दिवसातच कांचन हिने आपले रंग दाखवायला सुरू केले आणि त्यावरून सासु सुनाची भांडणे होऊ लागली. बुधवारी सकाळी असाच वाद झाल्यावर कांचनने चक्क सासू कौशल्याबाईला लाकडी दांड्याने मारहाण केली त्यात कौशल्याबाई रक्ताच्या थारोळ्यात खाली पडल्या. सासूचा मृत्यू झाल्याचे लक्षात येतात कांचनने चलाखीने लाकडी दांडा जाळण्याचा प्रयत्न केला मात्र तो पेट घेईना म्हटल्यानंतर तिने घरावर फेकून दिला आणि नातेवाईकांना बोलावून चक्कर आली आणि त्या पडल्या आहेत असे सांगितले आणि कौशल्या यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता.

कांचन ही सतत आपल्या आईला मारहाण करत होती म्हणून गणेश याने आईला एक वेगळी रूम काढून दिली होती अशीही माहिती समोर आलेली आहे. गणेश याने आपण मध्ये पडल्यानंतर पत्नी आपल्याला देखील मारहाण करायची असेही म्हटलेले असून गणेश याने फिर्याद दिल्यानंतर असून कांचनच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे

No comments:

Post a Comment