*लाखोच्या गुटक्यासह दोन आरोपीवर केला गुन्हा दाखल!
*अवैध धंद्यावाल्यांचे धाबे चांगलेच दणाणले!
परळी वैजनाथ (प्रतिनीधी)आयपीएस पंकज कुमावत यांच्या पथकाने काल रात्री 8-30 वाजण्याच्या सुमारास अवैध धंद्यावर धडक कारवाया केल्या. यामध्ये परळीतून सव्वा लाखांपेक्षा अधिक किंमतीचा गुटखा पकडला आहे. याप्रकरणात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त अधिक माहितीनुसार, दिनांक 28 एप्रिल रोजी 8-30 वा. जलालपुर रोड विद्यानगर परळी येथील एका दुकानात 126653 रुपयाचा गुटखा व तत्सम माल मिळुन आला. यातील आरोपीने स्वतःचे फायद्यासाठी विना परवाना बेकायदेशीररीत्या महाराष्ट्र राज्यात आरोग्याचे दृष्टीने बंदी घातलेली असतानाही गोवा गुटखा, विमला पानमसाला, बाबा, नवरतन, आरएमडी सुगंधी तबांखु, राजनिवास गुटख्याचा माल चोरटी विक्री करण्यासाठी जवळ बाळगला. या मुद्देमालाची किमंत 126653/- रुपये आहे. आरोपी मालासह मिळुन आला म्हणुन त्यास हा माल कोठुन व कोणाकडुन आणला याबाबत विचारना केली असता आरोपीच्या सांगण्यावरून गुटका किंग अल्ताप पठाण रा.परळी याच्याकडुन आणल्याचे सांगितले. याप्रकरणी संबंधित दोन आरोपी विरुद्ध आयपीएस पंकज कुमावत पथकाचे पोलीस हवालदार बालाजी शेषेराव दराडे यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलीस ठाण्यात गु.रनं 84/ 2022 कलम 328,272,273 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
पुढील तपास सपोनि सपकाळ हे करीत आहेत.
मात्र या कारवाई ने अवैध धंदे करणाऱ्या माफियांच्या मात्र धाबे चांगलेच दणाणले असल्याचे परळी शहरात चर्चा सुरू आहेत.
तर गुटका किंग अल्ताब पठाण व त्याचे साथीदार खुले आम परळी शहरात फिरत असून त्यांना का ताब्यात घेतले जात नाही असा सवालही नागरिकांतून उपस्थित होत आहे
No comments:
Post a Comment