Monday, April 18, 2022

कत्तलखान्याकडे जाणाऱ्या अकरा गाई व आठ वासरांची पंकज कुमावत यांनी केली सुटका.



कुमावत सर यू आर ग्रेट…! 


*अकरा गाई व आठ वासरांची केली कसायांच्या तावडीतून सुटका.

केज (प्रतिनीधी):- सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत अखंड रात्र अन् दिवस कारवाया सुरू असून त्यांनी नेकनूर येथून कत्तल खान्याकडे जाणाऱ्या अकरा गाई आणि आठ वासरांची कसायांच्या तावडीतून सुटका केली आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. १७ एप्रिल रविवार रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना एका गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, आयशर टेम्पो क्रमांक (एम एच-१२/एच डी-०४२१) मध्ये विनापरवाना बेकायदेशीररित्या स्वतःच्या फायफ्यासाठी नेकनूर येथून अकरा गाई व आठ वासरे टेम्पोमध्ये भरून कत्तल करण्यासाठी बीड येथे घेऊन जात आहेत.

अशी माहिती मिळाल्यावर सदरची माहिती पोलीस ठाणे नेकनूर येथील पोलीस नाईक प्रशांत शिरसागर यांना कळवून सदर वाहनावर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले. नेकनूर येथील पोलीस ठाणे आमलदार यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे मार्गदर्शनाखाली प्राप्त माहितीचे आधारे सदरचा टेम्पो बीड नेकनुर ते बीड जाणारे रोडवर नेकनूर येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंप येथे दुपारी २:०० वाजता टेम्पो थांबवून टेम्पो चालकास नाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव शेख मज्जिद शेख रज्जाक रा. मोमिनपुरा बीड असे सांगितले. त्या टेम्पोची पाहणी केली असता त्यात अकरा गाई व आठ वासरे मिळून आली. टेम्पो चालकास गाईचे व वासरांचे दाखल्या बाबत विचारपूस केली असता त्याच्या जवळ नसल्याचे सांगितले

ही जनावरे मोमीनपुरा बीड येथील व्यापारी सोहील जलील कुरेशी यांची असून त्यांच्या सांगण्या वरून नेकनूर येथून टेम्पोमध्ये भरून बीड येथे घेऊन जात आहे असे सांगितले. त्याच्या ताब्यात मिळून आलेल्या जनावरांची किंमत २ लाख रुपये व टेम्पो किंमत च४ लाख असा एकूण ६ लाख रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. टेम्पो व जनावरे ताब्यात घेऊन पोलीस ठाणे नेकनुर येथे आणून त्याची विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. 

ही कारवाई सहाय्याक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार प्रशांत क्षिरसागर, मारुती कांबळे, शिवाजी उगलमुगले आणि सय्यद अब्दुल्ला यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment