यांच्याकडे ताबा
मिरी तांडोर साठा क्रमांक १ मंगलमूर्ती स्टोन क्रशर यांनी १२.३४ कोटी , मिरी – सिद्धापूर साठा क्रमांक १ शिक्षंदा लाइफ स्टाइल यांनी ७.९ २ कोटी , घोडेश्वर तामदर्डी साठा क्रमांक १ चौधरी पॉवर प्रोजेक्ट यांनी ३.५३ कोटी, तर घोडेश्वर तामदर्डी साठा क्रमांक २ प्रतीक इन्फ्रास्ट्रक्चर यांनी ५.११ कोटी रुपयांस घेतला आहे.यापैकी शिक्षदा व प्रतीक इन्फ्रास्ट्रक्चर यांनी १०० टक्के रक्कम यापूर्वी भरली आहे. मिरी – तांडोर येथील साठ्यास सर्वाधिक १२ कोटी ३४ लाख रुपये मिळाले आहेत.
मंगलमूर्ती स्टोन क्रशर यांनी हा मक्ता घेतला आहे. घोडेश्वर तामदर्डी साठा क्रमांक १ चे चौधरी पॉवर प्रोजेक्ट यांनी ३.५३ कोटी रुपयाची रॉयल्टी शासनाकडे जमा केली आहे. चारपैकी मिरी सिद्धापूर साठा क्रमांक १ शिक्षदा लाइफ स्टाइल , घोडेश्वर तामदीं साठा क्रमांक २ प्रतीक इन्फ्रास्ट्रक्चर यांनी पर्यावरण विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र दाखल केल्याने या दोन वाळू साठ्यांचा ताबा ठेकेदारांना दिला गेला. आठ ते दहा दिवसांपासून वाळू उपसा सुरू झालेला आहे.
No comments:
Post a Comment