परळी वैजनाथ (प्रतिनीधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शिवतीर्थ मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय परळी वैजनाथ येथे दि.17/04/2022 रविवार रोजी सन्माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महापुरुषांची जयंती मनसेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्यांनी आपल्या घरी सना प्रमाणे व पक्ष कार्यालयात मोहत्सवा प्रमाणे साजरी करा असा राज साहेब ठाकरे यांचा संदेश पक्षातील मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे, राज्य सरचिटणीस संतोष भाऊ नागरगोजे, राज्य उपाध्यक्ष अशोक भाऊ तावरे, प्रवक्ते प्रकाश काका महाजन यांच्या सुचणे वरून मनसे जिल्हा अध्यक्ष सुमंत धस, मनसे महिला आघाडी जिल्हाध्यक्षा रेखाताई अंबुरे, जिल्हा सचिव रवी दादा नेमाने, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता भाऊ दहीवाळ, तालुका अध्यक्ष श्रीकांत पाथरकर यांच्या मार्गदर्शनाखाली, मनसेचे परळी वैजनाथ शहर अध्यक्ष वैजनाथ कळसकर यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कार्यालयात,
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त रित्या "गुरू शिष्य" विचारांचा जयंती महोत्सव साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात संबोधित करताना कार्यक्रमांचे अध्यक्ष अॅड.अश्वीन साळवे यांनी महात्मा फुले यांच्या संकल्पनेतून विधवा पुनर्विवाह कायदा कसा निर्माण झाला, तो लोकांना पटवून देण्यासाठी किती संघर्ष करावा लागला ते सवीस्तर पणाने आपल्या भाषणातुन सांगितले,
तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अॅड.अर्जुन सोळंके यांनी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संवीधान निर्मिती कशी झाली व भारतातील लोकशाही हा विषय खूप चांगल्याप्रकारे आपल्या भाषणातून समजावून सांगितला,
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना मनसेचे शहर अध्यक्ष वैजनाथ कळसकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जयंती साजरी होणे ही काळाची गरज आहे कारण महापुरुषांचे विचार स्वतः आत्मसात करणे व इतर लोकांना पटवून सांगणे हीच खरी महापुरुषांना अपेक्षित जयंती साजरी करण्यासारखे आहे हे प्रस्ताविक भाषण करताना विषद केले. तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शहर उपाध्यक्ष गणेश चव्हाण यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निस्वार्थ प्रयत्न करणारे मनसेचे शहर उपाध्यक्ष प्रशांत कामाळे, सुमित कलशेट्टे, महेश शिवगण, तालुका उपाध्यक्ष विठ्ठल दादा झिलमेवाड, शहर सचिव डॉ.अशोक मंत्री, शाखा अध्यक्ष धनराज आवाड, सिद्धार्थ लांडगे, बालाजी चुणचुणे, आदींनी परिश्रम घेतले तर या कार्यक्रमास विद्यासागर गायकवाड, हनुमान सातपुते, माणीक लटींगे, महेश घेवारे, सुनील भोसले, सुहास विर, धनंजय गाडवे सोमनाथ राजनाळे, किशोर कुरे, श्रीमंत फड, काशीनाथ कापसे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment