Monday, April 18, 2022

शिवसेनेच्या आमदाराच्या पत्नीची आत्महत्या … परीसरात खळबळ




मुंबई-(प्रतिनीधी)
शिवसेनेच्या आमदाराच्या पत्नीचा मृतदेह रविवारी रात्री मुंबईच्या कुर्ला येथील त्यांच्या घरात फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. सदरची घटना पाहून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी कुडाळकर यांचा मृतदेह कुर्ला पूर्व येथील नेहरू नगर भागातील डिग्निटी कोऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमधील त्यांच्या फ्लॅटमध्ये रात्री 8.30 च्या सुमारास लटकलेल्या अवस्थेत आढळून आला, अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे

नेहरू नगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक तपासात त्यांनी आत्महत्या केली असल्याचे दिसते आहे. मात्र, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मंगेश कुडाळकर सध्या कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

पोलिसांनी अद्याप या घटनेची संपूर्ण माहिती दिलेली नाही. घटनेच्या वेळी त्या घरात एकट्याच होत्या की आणखी कोणी होते हे अद्याप समजू शकलेले नाही. या प्रकरणाचा तपास सुरू केल्याचे पोलिसांनी सांगितले यामुळे आत्महत्या का केली हे लवकरच निष्पन्न होईल.

No comments:

Post a Comment